• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0
Example Rich Text
In Maharashtra

Asset Publisher

मोदक

संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारचे मोदक तयार केले जातात. प्रदेशातील संसाधनांच्या उपलब्धतेनुसार घटक आणि बनवण्याच्या प्रक्रियेत फरक दिसून येतो. मोदक हे एक गोड मिष्टान्न आहे जे प्रामुख्याने तळणीचे आणि उकडीचे असे दोन प्रकारात बनविले जातात. काही प्रदेशात मोदकाला लाडू देखील म्हटले जाते. थोडक्यात, प्रामुख्याने गोल आकार असलेल्या विविध प्रकारे बनवलेल्या लाडू ला महाराष्ट्रात मोदक असे संबोधले जाते. गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे पुरावे अनेक साहित्यात सापडतात म्हणून महाराष्ट्रातील गणपती उत्सवामुळे मोदकाला महत्त्व प्राप्त झाले आहे.


मोदक हा एक असा भारतीय पदार्थ आहे जो सर्वत्र मिष्टान्न किंवा गोड पदार्थ म्हणून लोकप्रिय आहे. मोदकाच्या आतील गोड सारण हे ताजे किसलेले खोबरे आणि गूळ ह्याचे मिश्रण असते, तर बाहेरील मऊ कवच तांदळाच्या पिठापासून किंवा गव्हाच्या पिठापासून बनवले जाते. मोदक बनवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक उकडीचे मोदक आणि दुसरे तळणीचे मोदक. उकडीच्या मोदका मध्ये थोडा फार फरक असतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण विभागात उकडीचे मोदक बनविले जातात. ह्याला वाफवलेले किंव्हा उकडीचे मोदक असे म्हटले जाते जे गरमागरम खाताना त्याच्यात वरून साजूक तूप घालून खाल्ले जाते. उकडीच्या मोदकाचे आवरण तांदळाच्या पिठाचे असते तर आत ताज्या ओल्या खोबऱ्याचे आणि गूळ किंव्हा साखरेचे सारण भरले जाते. तळणीचे मोदक तेलात किंव्हा तुपात तळले जातात आणि ते फार काळ टिकतात. तळणीच्या मोदकाचे आवरण गव्हाच्या पिठाचे असते ज्याला काही लोक कणकेचे मोदक असे हि म्हणतात. तळणीच्या मोदकांना उकडीच्या मोदकाला असते तसेच सारण करतात फक्त आत ओल्या खोबऱ्या ऐवजी सुख्या खोबऱ्याचे आणि गूळ किंव्हा साखरेचे सारण भरले जाते.


मोदक यामध्ये “मोद” म्हणजे जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते. मोदकाची कुठेच इतिहास नोंद नाहीये. परंतु असे म्हटले जाते कि जवळपास २००० वर्षांपासून महाराष्टात सांस्कृतिकदृष्ट्या ओळखले जाणारे मोदक हे लोकप्रिय खाद्य आहे. प्राचीन भारतीय साहित्यात मोदकाचे संदर्भ आहेत, परंतु त्याच्या पाककृतीची किंव्हा मोदक बनविण्याच्या पद्धितीची नोंद कुठेच नाहीये. सांस्कृतिकदृष्ट्या मोदकाचा संबंध गणपतीशी आहे. गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात. मोदक हे गणपती बाप्पाचे अतिशय आवडते खाद्य मानले जाते. मोदक ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे.


Images