• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

माउंट मेरी चर्च

बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट सामान्यतः माउंट मेरी चर्च म्हणून ओळखले जाते. हे रोमन कॅथोलिक चर्च १०० वर्षांहून अधिक काळ जुने आहे. 
जिल्हा/विभाग
    
वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
१६ व्या शतकात एका पोर्तुगीज कंपनीने माउंट मेरी चर्च बांधले. या चर्चचा उद्देश वर्जिन मेरीच्या भेटीसाठी/भक्तीसाठी समर्पित असणे हा होता. मेरीची मूळ मूर्ती पोर्तुगालमध्ये लाकडापासून बनवली गेली आणि जेसुइट धर्मगुरूंनी इथे पाठवली.
१७ व्या शतकाच्या दरम्यान, अरबी चाच्यांनी वांद्रेवर हल्ला केला. ते मौल्यवान वस्तू आणि खजिना शोधत असताना चर्चमध्येही शोध घेऊ लागले, मेरीच्या पुतळ्याचा उजवा हात तो सोन्याचा आहे का हे तपासण्यासाठी तोडून काढला. जेव्हा त्यांनी हि कल्पना अंमलात आणण्याची व्यवस्था केली, तेव्हा मधमाश्यांनी चर्चमध्ये शिरकाव केला आणि चाच्यांवर हल्ला केला. चाच्यांनी तिथून पळ काढला. या टप्प्यावर, त्यांना समजले की हे चर्चमधील त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम आहे. १७६० मध्ये चर्चची पुनर्बांधणी करण्यात आली, तेव्हा तुटलेल्या प्रतिमेच्या जागी जवळच्या सेंट अँड्र्यू चर्चमधील अवर लेडी ऑफ नेव्हिगेटर्सची प्रतिमा ठेवण्यात आली. कोळी लोक मेरी मातेला मोत माऊली म्हणतात, ज्याचा अर्थ पर्वताची आई (मोत म्हणजे "माउंट" आणि माऊली म्हणजे आई). या चर्चमध्ये ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचे अनुयायी आणि भाविक / पर्यटक येतात. 

भौगोलिक माहिती    
बांद्रा (उपनगरांची राणी) येथील समुद्रसपाटीपासून सुमारे २६२ फूट उंचीवर एका छोट्या टेकडीवर माउंट मेरी चर्च आहे. हे मुंबईतील सर्वात सुंदर चर्च आहे. येथून अरबी समुद्र आणि मुंबईचे मोकळे आकाश बघता येते.

हवामान    
या भागातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
कोकणात हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी      
वांद्रे जत्रेदरम्यान उत्सवाला उपस्थित राहा आणि चर्चमध्ये प्रार्थना करा. धार्मिक कलाकृती, नावीन्यपूर्ण आकाराच्या मेणबत्त्या आणि व्हर्जिन मेरीच्या मेणाच्या मुर्त्या इथे खरेदी करता येतात.

जवळची पर्यटनस्थळे     
•    वांद्रे बँडस्टँड:- एक सुंदर समुद्र किनाऱ्यालगत फेरफटका मारण्यासाठीचे सार्वजनिक (वॉक-वे) ठिकाण आहे. अनेक कलाकार वांद्रे येथे राहतात. वांद्रे बँडस्टँडच्या सुरुवातीला गॅलक्सी अपार्टमेंट सलमान खानचे घर तसेच शाहरुख खानचे घर रस्त्याच्या शेवटी आहे. (०.९ किमी)
•    बांद्रा किल्ला:- वांद्रे बँडस्टँड रस्ता बांद्रा किल्ल्यावर संपतो. या ठिकाणी अरबी समुद्र आणि वांद्रे-वरळी सी-लिंकचे दृश्य सुंदर दिसते. (०.८ किमी)
•    सिद्धिविनायक मंदिर: प्रभादेवी (७ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    रेल्वे मार्ग:- पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वांद्रे रेल्वे स्टेशन हे जवळच्या लोकल उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. चर्चपासून २०मिनिटे. (४.४ किमी)
•    हवाई मार्ग:- सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. (8 किमी)
•    रस्त्याने:- रस्त्याने सहज पोहोचता येते. कार, बाईक आणि ऑटो रिक्षा चर्चच्या गेटवर नेऊन सोडतात. वांद्रे बस आगार हे सर्वात जवळचे आगार आहे. चर्च, बस स्टॉपपासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे. बेस्ट बस क्र. २११, २१२, २१४  माउंट मेरीला जाते.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून ते पंचतारांकित हॉटेल/रेस्टॉरंटपर्यंत सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांसाठी मुंबई प्रसिद्ध आहे.
लोक प्रामुख्याने कोस्टल फ्लेवर्स, (बॉम्बिल फ्राय, तिसऱ्या सुक्का मसाला आणि फिश करी राइस), परवडणारे मद्य आणि संगीत पसंत करतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
विविध उपनगरांसह मुंबई हे एक महागडे शहर आहे. आर्थिक आणि मनोरंजनाची राजधानी असल्याने देशातील इतर शहरांच्या तुलनेत ते महाग आहे. वांद्रे, दक्षिण मुंबई, पवई सारखी ठिकाणे सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्तम उपनगरी क्षेत्रे आहेत. मध्यमवर्गीय पर्यटक त्यांना परवडणारी बजेट हॉटेल्स पसंत करतात.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ आहे.
•    ८ सप्टेंबर हा व्हर्जिन मेरीचा वाढदिवस म्हणून जगभरातील कॅथलिक साजरा करतात. आठवडाभर चालणारी हि जत्रा दरवर्षी ८ सप्टेंबरपासून सुरु होते. ८ सप्टेंबर या दिवशी रविवार नसेल तर हि जत्रा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी सुरू होते. 
•    वांद्रे जत्रेपूर्वी, नोव्हेनाचे ९ दिवस पाळले जातात.
•    चर्च वर्षभर खुले असते.
•    वेळ:- सोमवार ते शनिवार- सकाळी ८.०० ते दुपारी १.००, दुपारी २.०० ते रात्री ८.३० 
•    शनिवार- सकाळी १०.३० ते रात्री ८.३० 
•    कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी