• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

नळदुर्ग किल्ला

नळदुर्ग किल्ला हा एक अवाढव्य किल्ला आहे. हा एक अपराजित किल्ला आहे जो विजापूरच्या आदिल शाहीच्या काळात बांधण्यात आला. ११४ बालेकिल्ल्यांसह किल्ल्याच्या भिंती ३ किमी लांबीच्या आहेत.
नळदुर्ग किल्ला मध्ययुगीन भारताच्या लष्करी अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरचा उत्तम नमुना मानला जातो.

जिल्हे/प्रदेश     
उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
नळदुर्ग किल्ला मध्ययुगीन काळातील एक उत्कृष्ट भूमीगत किल्ला आहे. आख्यायिका सांगतात की हा राजा नल यांनी बांधला होता, ज्यांच्या नावावरून शहर आणि किल्ल्याला नावे देण्यात आली आहेत. कल्याणीच्या चालुक्य राजांच्या काळापासून तटबंदीचा वारसा मिळाला. नंतर या किल्ल्यावर बहामनी, आदिल शाह आणि नंतर मोगलांचे नियंत्रण होते. याच किल्ल्यावर चांद बीबी सुलताना आणि अली आदिल शाह यांचे लग्न झाले. नवाब अमीर नवाझुल मुल्क बहादूर आणि निजाम उल मुल्क द्वितीय मजारची मुलगी राजकुमारी फखरुन्निसा बेगम यांची मखबारा (कबर) नळदुर्ग येथे आहे. नळदुर्गातील व्यक्ती आणि संपूर्ण मराठवाड्यातील लोकं त्यांच्या दिवंगत शासकाला श्रद्धांजली देण्यासाठी या पवित्र स्थळाला भेट देतात. नवाब साहब यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी १९४८ पर्यंत राज्यपाल बनले.
किल्ला आजही भक्कम आहे आणि किल्ल्याच्या भिंती 'डिसीड बेसाल्ट' खडकापासून बांधल्या आहेत. धरणाची उंची ९० फूट, लांबी २७५ मीटर आणि वरून ३१ मीटर रुंद आहे. धरणाच्या केंद्रबिंदूत एक खोली आहे ज्यामध्ये एक आनंददायी नियोजित गॅलरी आहे ज्याला पाणी-महल म्हणतात जो खऱ्या अर्थाने पाण्यावरचा किल्ला आहे. ह्या धरणा मुळे गडावर एक उत्कृष्ट तलाव तयार झाले आहे. जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा पाणी एका वक्रता धरणावर वाहते आणि पाणी-महालाच्या आत साचून राहते. ह्या पासून बनलेला छोटा धबधबा आपल्याला इथे पाहावयास मिळतो. मध्ययुगीन भारतातील जल मंडळांचे हे अविश्वसनीय उदाहरण आहे.
किल्ल्यातील १५ फूट उंच 'उपलय' किंवा बुरुज हे नळदुर्ग किल्ल्याचा अविश्वसनीय आकर्षक स्थळ आहे. या किल्ल्यावर काही काळापूर्वीपासून १८ फूट आणि २१ फूट अशा दोन तोफा आहेत. नळदुर्ग किल्ला म्हणजे अगदी नयन सुखद अनुभव आहे आणि एक असा किल्ला ज्यामुळे इतिहासाकडे पुन्हा वळण्याची मनशा होते.
     
भूगोल    
नळदुर्ग हा एक भुईकोट किल्ला आहे, हा एक भव्य किल्ला असल्यामुळे पर्यटकांना संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी खूप चालावे लागेल.

हवामान/वातावरण    
औरंगाबाद भागात उष्ण आणि कोरडे हवामान असते. उन्हाळा हा ऋतू हिवाळा आणि पावसाळ्यापेक्षा अधिक तीव्र असतो, ज्यात तापमान ४०.५ अंश सेल्सिअस पर्यंत असतो. 
हिवाळा सौम्य असतो आणि सरासरी तापमान २८-३० अंश सेल्सिअस पर्यंत बदलत राहतो.
पावसाळ्यात अत्यंत हंगामी चढउतार असतो आणि औरंगाबादमध्ये वार्षिक पाऊस सुमारे ७२६ मिमी होतो.

करावयाच्या गोष्टी    
किल्ल्यात पाहण्यासारखे बरेच काही आहे!
१. उपल्याचा बुरुज
२. धरण
३. पाणी महाल
४. तलाव
५. पावसाळ्यातील हंगामी धबधबे

जवळचे पर्यटन स्थळ    
नळदुर्ग किल्ल्याजवळ पर्यटकांसाठी अनेक आकर्षक स्थळे आहेत,
१. तुळजाभवानी मंदिर
२. रणमंडल किल्ला
३. धाराशिव लेणी
४. परंडा किल्ला

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा     
किल्ल्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत,
- हवाई: सर्वात जवळचे राष्ट्रीय विमानतळ औरंगाबाद विमानतळ आहे, जे उस्मानाबादपासून २६५ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
- रेल्वे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सोलापूर स्टेशन आहे जे किल्ल्यापासून ५० KM अंतरावर आहे.
- रस्ता: किल्ला उस्मानाबाद पासून ५० किमी, तुळजापूर पासून ३५ किमी, सोलापूर पासून ५० किमी, पुणे पासून २९५ किमी आणि मुंबई पासून ४६९ किमी आहे.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
स्थानिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
- उस्मानाबाद आणि सोलापूरसारख्या जवळच्या शहरांमध्ये आपल्या बजेटनुसार निवास व्यवस्था उपलब्ध आहे.
- तुळजापूर, उस्मानाबाद आणि सोलापूर सारख्या जवळच्या मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये रुग्णालये उपलब्ध आहेत.
    
जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट    
तुळजापूर रिसॉर्ट.


स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना    
-किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ७:०० पासून ते संध्याकाळी ७:०० पर्यंत आहे. 
- पावसाळ्यादरम्यान सुंदर धबधबे पाहता येण्यासाठी पावसाळ्यानंतर चा काळ किल्ला पाहण्यसाठीचा उत्तम काळ आहे.
- हिवाळ्यात तापमान थंड असल्याने आपण जाऊ शकतो.
- हवामानासाठी योग्य असलेले कपडे आणि चप्पल किंवा शूजची चांगली जोडी घालावी कारण किल्ला पाहण्यासाठी भरपूर चालत जावे लागते.

परिसरात बोलली जाणारी भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी.