• Screen Reader Access
 • A-AA+
 • NotificationWeb

  Title should not be more than 100 characters.


  0

Asset Publisher

नांदेड

नांदेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हा राज्याच्या सर्वात मोठा आठवा शहरांचा समुह आहे. हे मराठवाडा पोटविभागातील ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे.

जिल्हे/प्रदेश  

नांदेड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास       

नांदेड हे जुने आणि ऐतिहासिक धार्मिक केंद्र आहे. हे मराठवाडा उपविभागातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. नांदेड हे नांदेड जिल्ह्याच्या कारभाराचे केंद्र आहे. नांदेड हे शीख यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे कारण १० व्या शीख गुरूनी (गुरु गोविंद सिंग) नांदेड हे त्यांचे कायमचे निवासस्थान ठरवले आणि १७०८ मध्ये त्यांचा शाश्वत प्रवास सुरू करण्यापूर्वी गुरुग्रंथ साहिबकडे त्यांचे गुरुत्व दिले.

भूगोल

नांदेड जिल्ह्याच्या उत्तरेकडील बाजूस यवतमाळ जिल्हा, पश्चिमेकडील बाजूस परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे, दक्षिणेकडील बाजूस कर्नाटकचा बिदूर जिल्हा आणि पूर्वेकडील बाजूस आंध्र प्रदेशातील निजामाबाद आणि आदिलाबाद जिल्हे आहेत. माती मुख्यतः आग्नेय खडकांची बनलेली असते आणि ती काळी व मध्यम काळी असते.

हवामान/वातावरण  

या प्रदेशाचे हवामान उष्ण आणि कोरडे असते. हिवाळा आणि मान्सूनपेक्षा उन्हाळा अधिक तीव्र असतो, ४०. ५ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत जाते.

हिवाळा सौम्य असतो आणि सरासरी तापमान २८-३० अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते.

मान्सून हंगामात अत्यंत हंगामी बदल होतात आणि या प्रदेशात वार्षिक पावसाचे प्रमाणे सुमारे ७२६ मिमी असते.

करावयाच्या गोष्टी    

गुरुद्वारा आणि किल्ले नांदेडमधील पर्यटनाचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. इतिहासप्रेमींसाठी आणि साहसप्रेमींसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे. हे गुरुद्वारा, प्राचीन किल्ले, रस्त्यावरील खाद्यपदार्थ इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. शहरात आधुनिक आणि जुने स्वरूप यांचे रोमांचक मिश्रण आहे.

जवळचे पर्यटन स्थळ        

नांदेडसह भेट देण्याची इतर ठिकाणे:

●        श्री हजूर साहिब: श्री हजूर साहिबमुळे नांदेड हे शीख लोकांचे तीर्थक्षेत्र म्हणून लोकप्रिय आहे, जे शीख धर्मातल्या सर्वाधिक महत्वाच्या पाच तख्तांपैकी एक आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांनी अखेरचा श्वास घेतला.

●        नांदेड किल्ला: गोदावरीने किल्ल्याभोवती घातलेल्या वेढ्याच्या देखाव्यात एखादा बुडून जातो. उत्कृष्ट देखाव्यांचे वरदान असलेला हा किल्ला फोटोग्राफर आणि आर्किटेक्चरसाठी तसेच इतिहासप्रेमींसाठीचे नांदेडमधील लोकप्रिय आकर्षण म्हणून सिद्ध होतो.

●        सहस्त्रकुंड धबधबा: बाणगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा नांदेडपासून सुमारे १०७ किमी अंतर दूर आहे आणि तणाव कमी करण्यासाठीचे हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. जवळजवळ ५० फूट उंचीमुळे, धबधबा "मराठवाड्यातील नायगरा धबधबा" म्हणूनच प्रसिद्ध आहे. धबधब्याच्या परिसरात टेहळणी बुरूजावर चढून आजुबाजूचा हवाई देखावा पहाता येतो. हे ठिकाण वर्षभर प्रवाशांसाठी उपलब्ध असते, परंतु पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधब्याला भेट देणे अधिक आल्हाददायक असते.

●        कंधार किल्ला: २४ एकर क्षेत्रात पसरलेला आणि खंदकाने वेढलेला, नांदेडपासून ३४ किमी अंतरावर असलेला कंधार किल्ला आहे. प्रेक्षणीय पर्यटन स्थळांमध्ये जिन्सी गेट, मचाली गेट, लाल महाल, दरबार महल, अंबर खाना आणि लोकप्रिय शीश महल यांचा समावेश आहे.

●        कालेश्वर मंदिर: कालेश्वर हे स्थळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधते. भव्य देखाव्यांसह शांततेसाठी लोकप्रिय असलेल्या या स्थळास कोणीही आकर्षक अशा मंदिरात आशीर्वाद मागू शकतो, सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो किंवा बोट राइडचा आनंद उपभोग घेऊ शकतो. व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती घेण्यासाठी आणि मिळणाऱ्या शांततेचा आनंद घेण्यासाठी कालेश्वर मंदिर हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा

 • नांदेडला सर्वात जवळचे देशांतर्गत विमानतळ ९. ६ किमी अंतरावर आहे.
 • ३. २ किमीवर नांदेडमध्ये रेल्वे स्टेशन आहे ज्याचे नाव हजूर साहिब रेल्वे स्टेशन आहे (१२ मिनिटे).
 • रस्त्याने नांदेड हे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांशी आणि मुख्य राज्यांशी रस्त्याने जोडले गेलेले आहे. खाजगी, तसेच सरकारी बस या दोन्ही शहरात चालतात.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल     

नांदेडमध्ये अनेक समाज आहेत जे गेल्या काही दशकांपासून त्यांचे पदार्थ प्रस्तुत करत आहेत आणि त्यांनी अनेक चवदार पदार्थ सादर केले आहेत.

●        टिहरी - ही पाककृती शिजवलेल्या तांदळात भरपूर मसाले आणि भाज्या घालून तयार केली जाते. पाककृती चवीनुसार थोडी मसालेदार असते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीमध्ये उपलब्ध असते.

●        बिर्याणी - बिर्याणी ही शिजवलेल्या तांदळापासून बनवली जाणारी पाककृती आहे. बिर्याणीचे भारतात अनेक प्रकार केले जातात जसे हैदराबादी बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी वगैरे. येथे सर्व प्रकारच्या बिर्याणी मिळू शकतात परंतु त्यांच्या शाकाहारी बिर्याणीची शिफारस इतर कोणत्याही बिर्याणीपेक्षा अधिक केली जाते.

●        शेक्स- नांदेड शहरात उकाड्याच्या काळात रस्त्यावर विकले जाणारे शेक ही सर्वोत्तम पेये आहेत. उकाड्यात कोणासही तरतरी देणारी ही पेये आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन     

 • नांदेडमध्ये विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत
 • नांदेडमध्ये विविध रुग्णालये आहेत.
 • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस २. ४ किमी अंतरावर आहे.
 • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन ०. ७ किमी अंतरावर आहे.

जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट 

एमटीडीसी रिसॉर्ट नांदेडमध्ये उपलब्ध आहे.

स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना     

नांदेड उन्हाळा, थंड हिवाळा आणि मुसळधार पाऊस अनुभवते. या ऐतिहासिक शहराला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे. हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत चालू राहतो. पर्यटक पर्यटन स्थळे आणि इतर उपक्रमांचा आनंद आरामात घेऊ शकतात.

परिसरात बोलली जाणारी भाषा    

इंग्रजी, हिंदी, मराठी, पंजाबी