नांदुर मध्यमेश्मर - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
नांदुर मध्यमेश्मर
नांदुर मध्यमेश्मर हे निफाड तालुका, नाशिक मधील खूप मोठे सरोवर आहे. हे गोदावरी आही कडवा नद्यांच्या संगमावर आहे. हे पक्षी अभयारण्य आहे, महाराष्ट्रचे भरतपुर म्हणून प्रसिद्ध आहे.
जिल्हा/प्रदेश
नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत
इतिहास
नांदुर माध्यमेश्मर हे गोदावरी नदीवरील दगडी तटबंदीला आहे. तलावामध्ये गेल्या नव्वद वर्षात वाहून आलेला गाळ आणि सेंद्रिय पदार्थांची साठवण आणि संचय आहे यामुळे उथळ बेटे, उथळ पाण्याचे तलाव तयार झाले आहेत. महाराष्ट्रातील ही पहिली पाणथळ जमीन आहे जी रामसर स्थळांमध्ये समविष्ट झाली आहे. याचे भौगोलिक स्थान आणि सौम्य हवामान ही जागा वर्षभर स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते. पक्षी निरीक्षणासाठी पसंतीचे ठिकाण असल्यामुळे हे महाराष्ट्रचे भरतपुर म्हणूनही ओळखले जाते.
भूगोल
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गोदावरी आणि कडवा नद्यांच्या संगमावर नंदुर माधमेश्वर हे एक पाणथळ ठिकाण आहे. भौगोलिक स्थान आणि त्याच्या प्रचंड परिघामुळे या मानवनिर्मित जलाशयाला चांगल्या पाणथळ जमिनीच्या अधिवासात रूपांतरित केले आहे.
वातावरण/हवामान
वार्षिक सर्वसाधारण तापमान हे २४.१ अंश सेल्सियस इतके असते.
हिवाळा या भागात तीव्र असतो आणि आणि तापमान ६ अंश सेल्सियस पर्यन्त खाली जाते.
उन्हाळ्यात सूर्यप्रकाश अतिशय तीव्र असतो. हिवाळ्यात नाही पण उन्हाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यामधील तापमान सुमारे 30 अंशपर्यंत जाते.
वार्षिक पर्जन्यमान अंदाजे ११३४ मिमी एवढे असते.
काय काय करू शकता
हे ठिकाण नांदुर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्यासाठीही प्रसिद्ध आहे. पक्षी प्रेमी आणि निरीक्षकांसाठी स्वर्ग आहे. परिसरात अनेक मंदिरे आहेत. जलाशय जेव्हा पूर्ण क्षमतेने भरतो तेव्हा सभोवतालचे आणि त्याच्या मोहक निसर्गाचे दृश्य विहंगम असते.
पर्यटन स्थळे/ जागा यांची नावे आणि स्थळांचे थोडक्यात ३-४ ओळींमध्ये वर्णन
दूधसागर धबधबा :- दूधसागर धबधबा ज्याला सोमेश्वर धबधबा असेही म्हटले जाते, हे नाशिकच्या सर्वात आकर्षक ठिकाणापैकी एक आहे ज्याला तुम्ही भेट देऊ शकता. दूधसागर धबधब्याला भेट देण्याचा कालावधी म्हणजे पावसाळा जेव्हा आजुबाजुची प्रत्येक गोष्ट आकर्षक असते. दूधसागर धबधबा हे जुलै ते सप्टेंबर महिन्यातील पर्यटकांचे लोकप्रिय आकर्षण आहे.
श्री.सप्तशृंगी गड नाशिक पासून ६० किमी अंतरावर कळवण तालुक्यात आहे. हे मंदिर समुद्र सपाटीपासून ४६५९ फुटावर सात शिखरांनी वेढलेल्या डोंगरावर आहे. हे महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठातील अर्धे शक्तिपीठ मानले जाते. देवीची मूर्ति सुमारे आठ फुट उंच आहे, जी नैसर्गिक खडकमध्ये कोरली आहे. तिला अठरा हात आहेत प्रत्येक बाजूला नऊ हात, प्रत्येक हात वेगळे शस्त्र धरण करतो.
त्र्यंबकेश्वर मंदिर : श्री त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील , नाशिक पासून २८ किमी अंतरावर ब्रम्हगिरी नावाच्या पार्वताजवळ आहे जिथून गोदावरी नदी वाहते. हे तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( १७४०-१७६०) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले. त्र्यंबकेश्वर मंदिर हे एक धार्मिक केंद्र आहे जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
पांडव लेणी :- पांडव लेणी हे असे एक ठिकाण आहे जे महाराष्ट्रात नाशिक मध्ये आहे. ही बौद्ध काळातील २४ लेण्यांची साखळी आहे. हे अतिशय लपलेले सौंदर्या आहे ज्याला भेट दिली पाहिजे. हे ट्रेकर्स मध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या सभोवतालचा हिरवा परिसर, निसर्ग शांतता प्रेमी पर्यटकांना आकर्षित करतो.
अंजणेरी डोंगर :- अंजणेरी डोंगर हे त्याचे नाव देवी अंजना वरुन पडले आहे, कारण असे मानले जाते की अंजणेरी देवीने हनुमानाला गुहेत जन्म दिला, जी या टेकडीच्या शिखरावर आहे आणि असे नाशिक मधील पवित्र स्थळ आहे. नाशिक मधील पर्यटन स्थळांपैकी अंजणेरी डोंगर चढणे हे कठीण आहे.
नाशिकमध्ये पाहण्यासारख्या सर्व ठिकाणांपैकी गांगपूर धरण बघितलेच पाहिजे. नांदुर माध्यमेश्वर पासून अंदाजे ६३ किमी अंतरावर गांगपूर धरण आहे जे अतिशय रोमांचक पर्यटन स्थळ आहे. हे पवित्र गोदावरी नदीवर आहे. धरणात जलक्रीडा व संबंधित उपक्रम करता येतात. एमटीडीसी संचालित बोट क्लब येथे आहे.
दुगारवाडी धबधबा : दुगारवाडी धबधबा नाशिकमध्ये भेट देण्यासारख्या सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी आरके आहे. हा भव्य धबधबा नांदुर माध्यमेश्वर पासून ८१ किमी वर आहे. जर तुम्हाला नाशिकच्या ग्रामीण परिसराचे खरे सौन्दर्य पाहावयाचे असेल तर पावसाळ्यात या ठिकाणाला जरूर भेट द्या.
या पर्यटन स्थळावर रेल्वे, हवाई, रस्ता ( ट्रेन, विमान, बस) मार्गे कसे जायचे, अंतर आणि लागणार्या वेळासह
नाशिक हे मुंबईशी एनएच-३ या महामार्गाने जोडलेले आहे. मुंबई १७० किमी ( ३ तास ५० मिनिटे ), पुणे २१२ किमी ( ४ तास २० मिनिटे ), औरंगाबाद १९६ किमी (४ तास ३० मिनिट ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी गाड्या, आणि लक्झरी उपलब्ध आहेत. नांदूर माध्यमेश्वर हे नाशिक पासून ४० किमी वर आहे.
जवळचे विमानतळ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ २१२ किमी ( 5 तास 20 मिनिटे).
जवळचे रेल्वे स्टेशन : निफाड रेल्वे स्टेशन १५.६ किमी ( ३० मिनिटे)
विशेष अन्नपदार्थ वैशिष्ट्य आणि हॉटेल
शाकहारी आणि मांसाहारी पदार्थ समाविष्ट असेलले महाराष्ट्रियन जेवण हे या जागेचे वैशिष्ठ्य आहे.
जवळील राहण्याच्या व्यवस्था आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलिस स्टेशन
नांदूर माध्यमेश्वर पासून १२ किमी अंतरावर निफाड येथे अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.
जवळचे हॉस्पिटल १२ किमी वर निफाड येथे आहे.
जवळचे पोस्ट ऑफिस १०.५ किमी अंतरावर वर नैताले येथे आहे.
जवळचे पोलिस स्टेशन ११.७ किमी अंतरावर निफाड येथे आहे.
जवळच्या एमटीडीसी रिसॉर्टचा तपशील
एमटीडीसी रिसॉर्ट नाशिक येथे उपलब्ध आहे.
भेट देण्याचे नियम आणि वेळ
भेट देण्यासाठी उत्तम महिना
नांदूर माध्यमेश्वर येथे भेट देण्यास योग्य कालावधी हा ऑक्टोबर,नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च हा आहे. जून पासून सप्टेंबर पर्यन्त या भागात खूप पाऊस पडतो.
या भागात बोलली जाणारी भाषा
इंग्रजी, हिन्दी, मराठी.
Gallery
How to get there

By Road
नाशिक हे मुंबईशी एनएच-३ या महामार्गाने जोडलेले आहे. मुंबई १७० किमी ( ३ तास ५० मिनिटे ), पुणे २१२ किमी ( ४ तास २० मिनिटे ), औरंगाबाद १९६ किमी (४ तास ३० मिनिट ) या शहरांपासून राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी गाड्या, आणि लक्झरी उपलब्ध आहेत. नांदूर माध्यमेश्वर हे नाशिक पासून ४० किमी वर आहे.

By Rail
जवळचे रेल्वे: निफाड रेल्वे स्टेशन १५.६ किमी (३० मिनिटे)

By Air
जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ २१२ किमी (५ तास २० मिनिटे)
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS