श्रावण पौर्णिमेचा दिवस 'नारळी पौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो, समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो शिवाय पाऊस व वाऱ्यांमुळे समुद्र सुद्धा खवळलेला असतो अशावेळी काही महिने मासेमारी बंद असते. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.नारळी पौर्णिमेच्या निमीत्ताने बनवलेल्या खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो. अनेक कोळी पाडयांवर रावस माश्याचा तळलेला तुकडा देखील नैवेद्यामधे ठेवला जातो.
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी राखी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरू होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या इंद्राच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुसऱ्या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरू झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिणीने भावाला राखी बांधावी असा संकेत रूढ झाला आहे.
याशिवाय हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.
ते समुद्राला प्रसन्न करण्यासाठी सजवलेल्या होडीतून / बोटीतून नारळ अर्पण करतात आणि नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करतात नैसर्गिक उत्पत्ती पासून संरक्षणाची आणि मोठ्या प्रमाणात मासेदारी व्हावी करीत विनंती करता कोळी सुमुदाय समुद्र किनाऱ्यावर जमून आपले पारंपरिक कोळी नृत्य करतात त्या दिवशी नारळी भात बनवला जातो खूप स्वादिष्ट आणि गोड असतो.
राक्षबांधन हा सण सुद्धा श्रावण पौर्णिमेचा दिवशी साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते आणि त्याचा दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला, भेट देऊन तुटीचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन परंपरेचा भाग म्हणून कर्तव्य व संरक्षणाची पार पाडणाऱ्या सैन्याला सुद्धा राखी बांधण्यात येते
महाराष्ट्र
22 ऑग 2021
Images