• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

पाचगणी

पाचगणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबईच्या आग्नेयेस असलेले एक हिल स्टेशन आहे.  याच्या आग्नेय दिशेला, राजापुरी लेणी आहेत जी पवित्र सरोवरांनी वेढलेली आहेत. तेथे हिंदू देव भगवान कार्तिकेय यांना समर्पित मंदिर आहे. पाचगणी हे नाव खऱ्या अर्थाने 'पाच टेकड्या' हा अर्थ सार्थक करते. हे ठिकाण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी सुप्रसिद्ध स्थान आहे जे जगातील विविध भागांतील पर्यटकांना आकर्षित करते.


जिल्हा/प्रदेश    
सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास    
१८६० च्या दशकात लॉर्ड जॉन चेसन यांच्या देखरेखीखाली हे ठिकाण एक आदर्श उन्हाळी रिसॉर्ट म्हणून ब्रिटिशांनी शोधले होते.  पाचगणी हे निवृत्तीनंतरचे ठिकाण म्हणून विकसित केले गेले कारण येथे वर्षभर सुखद वातावरण असते.  लॉर्ड जॉन चेसन यांनी रुस्तमजी दुबश यांच्यासह या प्रदेशातील टेकड्यांचे सर्वेक्षण केले आणि शेवटी दांडेघर, गोदावली, आंब्राळ, खिंगार आणि ताईघाट या पाच गावांच्या आसपासचे क्षेत्र निवडले.  या जागेला योग्य नाव दिले गेले- पाचगणी. याचा अर्थ म्हणजे "पाच गावांमधील जमीन" आणि चेसनला याचे अधीक्षक बनवण्यात आले.
१८६० च्या दशकात लॉर्ड जॉन चेसन यांच्या देखरेखीखाली हे ठिकाण एक आदर्श उन्हाळी रिसॉर्ट म्हणून ब्रिटिशांनी शोधले होते.  पाचगणी हे निवृत्तीनंतरचे ठिकाण म्हणून विकसित केले गेले कारण येथे वर्षभर सुखद वातावरण असते.  लॉर्ड जॉन चेसन यांनी रुस्तमजी दुबश यांच्यासह या प्रदेशातील टेकड्यांचे सर्वेक्षण केले आणि शेवटी दांडेघर, गोदावली, आंब्राळ, खिंगार आणि ताईघाट या पाच गावांच्या आसपासचे क्षेत्र निवडले.  या जागेला योग्य नाव दिले गेले- पाचगणी. याचा अर्थ म्हणजे "पाच गावांमधील जमीन" आणि चेसनला याचे अधीक्षक बनवण्यात आले.

भूगोल
पाचगणी समुद्र सपाटीपासून ४२४२.१ फूट उंचीवर आहे. पाचगणी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पाच डोंगरांच्या मध्ये आहे. पाचगणीच्या आसपास दांडेघर, खिंगार, गोदावली, आंब्राळ आणि ताईघाट अशी पाच गावे आहेत.  या खोऱ्यात कृष्णा नदी वाहते ज्यावर वाईपासून सुमारे ९ किमी अंतरावर धोम धरण बांधले गेले आहे. पाचगणीच्या पूर्वेला वाई, बावधन आणि नागेवाडी धरण, पश्चिमेस गुरेघर, दक्षिणेस खिंगार आणि राजपुरी आणि उत्तरेस धोम धरण आहे.

हवामान
•    पुण्यात वर्षभर उष्ण आणि अर्ध-शुष्क हवामान असते आणि येथील सरासरी तापमान १९-३३अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे पुण्यातील सर्वात गरम महिने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा हा तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    पुणे विभागात वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी पडतो.

येथे काय करावे      
पाचगणी मध्ये पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग, वॉटर सर्फिंग सारखे उपक्रम उपलब्ध आहेत. धोम धरण हे आणखी एक नयनरम्य ठिकाण आहे जिथे स्पोर्ट्स क्लब स्कूटर बोट, स्पीड बोट किंवा मोटरबोट राइड ची व्यवस्था करतात. पाचगणीमध्ये धबधब्यांचे सौंदर्य अनुभवता येते. पाचगणीमध्ये क्रीडा केंद्रे आहेत जी कॅम्पिंग, पाचगणीच्या जंगलात जीप सफारी, घोडा सफारी आणि पॅराग्लायडिंगची व्यवस्था करतात. पॅराग्लायडिंग हा पाचगणीतील सर्वात लोकप्रिय क्रीडा उपक्रमांपैकी एक आहे.

जवळची पर्यटन स्थळे    
•    टेबल लँड: महाबळेश्वरजवळील पाचगणीच्या सभोवतालच्या पाच डोंगरांवर ज्वालामुखी पठार आहे. हा पठार तिबेटी पठारा नंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. हे पठार, "टेबललँड" म्हणून ही ओळखले जातात. साहस आणि फोटोग्राफी प्रेमी येथे येतात, विशेषत: पावसाळ्यात. तेव्हां इथे नेत्रदीपक दृश्ये आणि उत्तम वातावरण असते. टेबल लँडवर अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. पाचगणी स्ट्रॉबेरी लागवड, अनेक प्रसिद्ध पब्लिक स्कूल्स, मॅप्रो आणि माला जॅमसाठी प्रसिद्ध आहे. (१.५ किमी)
•    प्रतापगड किल्ला: प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पर्वतीय किल्ला आहे. हा किल्ला महाबळेश्वरच्या हिल स्टेशनपासून २४ किमी अंतरावर आहे. या किल्ल्यावरून कोकण किनारपट्टीचे सुंदर दृश्य दिसते. भवानी मंदिर आणि अफझल खानची कबर ही इतर प्रेक्षणीय स्थळे आहेत. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांणा येथील देवी भवानीच्या मंदिरात तलवार आशीर्वाद म्हणून दिली होती.  छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतीचा सेनापती अफजल खान यांच्यात ऐतिहासिक लढाई प्रतापगडावर झाली.
•    कास तलाव आणि पठार: कास पठार साताऱ्याच्या पश्चिमेस २५ किमी अंतरावर आहे हे युनेस्को चे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ आहे. हे जैवविविधता हॉटस्पॉट आहे जेथेऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान दरवर्षी विविध प्रकारचे हंगामी रानफुले फुलतात आणि स्थानिक फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती उत्पन्न होतात. हे पठार ३,९३७ फूट उंचीवर स्थित आहे आणि हे क्षेत्र अंदाजे १० चौरस किलोमीटर आहे. कासमध्ये फुलांच्या वनस्पतींच्या ८५० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यामध्ये ऑर्किड, कार्वी सारखी झुडपे आणि ड्रोसेरा इंडिका सारख्या मांसाहारी वनस्पतींचा समावेश आहे. हे उंच डोंगराळ पठारावर आहे आणि हा गवताळ प्रदेश पावसाळ्यात, विशेषत: ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या सुरुवातीला 'फुलांच्या खोऱ्यात' बदलतो. कास पठारावर १५० किंवा त्याहून अधिक प्रकारची फुले, झुडपे आणि गवत आहेत. या हंगामात ऑर्किड ३-४ आठवड्यांच्या कालावधीसाठी येथे फुलतात. कास तलाव (१०० वर्षांपूर्वी बांधलेले) सातारा शहराच्या पश्चिम भागासाठी पाणी पुरवठ्याचे बारमाही स्त्रोत आहे.
•    सिडनी पॉइंट:  महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील पाचगणी हिल स्टेशनमधील पाचगणी बसस्थानकापासून २ किमी. अंतरावर, सिडनी पॉईंट हेएक प्रसिद्ध ठिकाण आहे. सिडनी पॉईंट कृष्णा खोऱ्याच्या समोर असलेल्या टेकडीवर आहे. सर सिडनी बेकवर्थ, कमांडर इन चीफ यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले.  ते सर जॉन माल्कम नंतर १८३० मध्ये बॉम्बेचे गव्हर्नर बनले. सिडनी पोंट कृष्णा खोरे, धोम धरण, कमळगड किल्ला आणि वाई शहराचे मोहक दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. या डोंगररांगेवरून पांडवगड आणि मंदारदेवच्या डोंगररांगांचे सुंदर दृश्य दिसते.
•    महाबळेश्वर: या सुंदर हिल स्टेशनला महाराष्ट्रातील हिल स्टेशनची राणी म्हणून संबोधले जाते. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई च्या जवळचे हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. भव्य डोंगर शिखरे, उतार, आणि जंगला आणि मैदानाचे विहंगम दृश्य येथील विशेषता आहे. महाबळेश्वर तीन गावांपासून बनलेले आहे- माल्कम पेठ, जुने महाबळेश्वर आणि शिंदोला गावाचा काही भाग. आर्थर सीट, लिंगमाला धबधबा, प्रतापगड किल्ला इ. (१९ किमी)
•    पारसी पॉइंट: महाबळेश्वर, पाचगणी, च्या वाटेवर पारसी पॉईंट भारतातील सुप्रसिद्ध ठिकाण आहे. येथे पर्यटकांना   धोम धरणाच्या स्वच्छ पाण्याचे आणि कृष्णा खोऱ्याचे मोहिनीचे चित्तथरारक विहंगम दृश्य बघायला मिळते. चारही बाजूंनी उंच, हिरव्या पर्वतांनी वेढलेले हे ठिकाण आयुष्यभर स्मरणात राहण्यासारखे आहे. हे ठिकाण तुमच्या मनाला ताजेतवाने करते आणि दैनंदिन जीवनातील सर्व तणाव आणि चिंता विसरायला लावते (१.८ किमी)

पर्यटन स्थळाला रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे कसे जावे (अंतर आणि वेळेसह)    
पाचगणी रस्त्या मार्गे उपलब्ध आहे. येथे जाण्यासाठी राज्य परिवहन तसेच खाजगी बसेस उपलब्ध आहेत.  रत्नागिरी २३९ किमी (५ तास २ मिनिटे)
•    मुंबई २४४ किमी (४ तास २६ मिनिटे)
•    पुणे १०१ किमी (२ तास १८ मिनिटे)
•    कोल्हापूर १६९ किमी ( तास  मिनिटे)
•    सातारा ५८. २ किमी (१ तास ३२ मिनिटे)
•    औरंगाबाद ३३७ किमी (६ तास ५२ मिनिटे)
•    नाशिक ३१८ किमी (६ तास २३ मिनिटे)
•    जवळचे विमानतळ: पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ १०९ किमी (२ तास २७ मिनिटे) अंतरावर आहे. 
•    जवळचे रेल्वे स्थानक: सातारा रेल्वे स्टेशन ५१. ८ किमी (१ तास १८ मिनिटे) अनंतरवर आहे. 

विशेष खाद्य आणि हॉटेल    
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या मैदानावर असल्याने महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. तसेच, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देतात. महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ ही या ठिकाणाची खासियत आहे उदाहरणार्थ वडा पाव, मिसळ पाव, ग्रील्ड चीज सँडविच, आइस्क्रीमआणि स्ट्रॉबेरी, बर्गर आणि रोल, गुजराती थाली आणि बरेच काही. पाचगणी हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे पण तिथे मलबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि गुसबेरी देखील पिकवली जाते.
 
जवळ उपलब्ध असलेली राहण्याची ठिकाणे, आणि हॉटेल, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस/ पोलीस स्टेशन   
   
•    पाचगणीमध्ये विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
•    रुग्णालये पाचगणी आणि सातारा भागात आहेत.
•    सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस पाचगणीपासून ०.३ किमी अंतरावर आहे.
•    सर्वात जवळचे पोलीस स्टेशन पाचगणी पासून ०.३ किमी. अंतरावर आहे.

एमटीडीसी रिसॉर्ट ची माहिती    
एमटीडीसी रिसॉर्ट पाचगणी पासून १९.७ किमी अंतरावर महाबळेश्वर मध्ये उपलब्ध आहे. 

क्षेत्राला भेट देण्याचे नियम आणि वेळ, भेट देण्याचा सर्वोत्तम महिना    
या ठिकाणी वर्षभर जाता येते. आहे. पाचगणीला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्याची सुरुवात. तेव्हां तापमान आरामदायक असते आणि फिरण्यासाठी उपयुक्त असते. भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे आहेत. मुसळधार पावसामध्ये ट्रेकिंग आणि धबधब्यांना जाणे टाळावे.
 
क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा    
इंग्रजी, हिंदी, मराठी.