• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

पांडव कुंड

३-४ ओळींमध्ये पर्यटकांचे गंतव्यस्थान / ठिकाणाचे नाव आणि ठिकाणाविषयीचे थोडक्यात वर्णन

पांडव कुंड पांडवकडा म्हणूनही ओळखला जातो आणि हा नवी मुंबईतील खारघर भागातील धबधबा आहे. हा धबधबा मुंबईजवळील सर्वात उंच (अंदाजे 105 मीटर) धबधब्यांपैकी एक मानला जातो.

जिल्हे/प्रदेश

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास

पांडव कडा हे नाव पौराणिक पात्र पांडवांवरून पडले. पौराणिक कथा सांगतात, महाभारतातील पांडव वनवास दरम्यान या या ठिकाणी गेले होते आणि या धबधब्याखाली असलेल्या डुबकी पुलात अंघोळ केली होती. अज्ञात स्थळांना पांडवांच्या वनवासाशी जोडणे ही एक सामान्य प्रथा आहे, ही फक्त लोककथा असू शकते. मुंबई आणि ठाण्यातील लोकांसाठी हे एक अतिशय सुंदर आणि ताजेतवाने करणारे ठिकाण आहे.

भूगोल

धबधबा एका खडकाळ कड्यावर आहे जो पनवेल खाडीच्या उत्तरेस आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील वसई खाडीच्या पूर्वेला आहे. त्याच्या सभोवताली घनदाट वनस्पती आहे.

हवामान/वातावरण

या ठिकाणी हवामान उष्ण दमट असुन भरपूर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात भरपुर म्हणजेच सरासरी 2500 मिमी ते 4500 मिमी इतका पाऊस पडतो. या हंगामात तापमान 30 अंश सेल्सियस पर्यन्त पोचते.

उन्हाळ्यात हवामान गरम आणि दमट असते, आणि तापमान 40 अंशापर्यन्त पोचते.

हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते (सुमारे 28 अंश ) आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते.

करावयाच्या गोष्टी

नैसर्गिक निसर्गसौंदर्य आणि स्वच्छ हवा हे या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण आहे. जर एखाद्याला व्यस्त दिनक्रमातून विश्रांती घ्यायची असेल आणि नैसर्गिक परिसरात आरामशीर वेळ घालवायचा असेल तर त्यांच्यासाठी ही योग्य जागा आहे. जंगले आणि डोंगराळ प्रदेशांनी वेढलेले हे ठिकाण मुंबई, ठाणे आणि उर्वरित उपनगरांच्या प्रदूषित शहरांच्या तुलनेत थंड आहे. पोहणे निषिद्ध असले तरी गंतव्यस्थानी फोटो काढण्यासाठी काही सुंदर ठिकाणे आहेत.

जवळचे पर्यटन स्थळ  

  • मुंबई: महाराष्ट्राच्या राजधानीपासून धबधबा 29.5 किमी अंतरावर आहे. मुंबई समुद्रकिनारे, श्री सिद्धिविनायक, महालक्ष्मी, लालबाग राजा इत्यादी धार्मिक स्थळे आणि गणेशोत्सव तसेच गोकुळाष्टमी सारख्या उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बॉलिवूड तसेच राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात पर्यटकांसाठी खूप काही आहे.
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान: पांडव कुंड धबधब्यापासून उद्यान 52 किमी अंतरावर आहे. उद्यान एक संरक्षित क्षेत्र आहे आणि हे मुंबईच्या मध्यभागी असलेले एक सहलीसाठीचे ठिकाण आहे. बाहेरील परिसराच्या तुलनेत भोवती घनदाट झाडे असल्यामुळे तापमान कमी असते. उद्यानात विविध प्रजातींचे वनस्पती तसेच प्राणी आहेत.
  • इमॅजिका: हे एक थीम पार्क आहे जे खोपोली जवळ पांडव कुंड धबधब्याच्या आग्नेय दिशेला 53 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी वॉटर राईडसह विविध राईड्स उपलब्ध आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्टीसाठी मुंबई तसेच पुण्याच्या जवळचे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे मनोरंजन पार्क, वॉटर पार्क आणि स्नो पार्क एकत्र आहेत.
  • ठाण्याची खाडी: या ठिकाणी फ्लेमिंगो अभयारण्य आहे आणि ते पांडव कुंड धबधब्याच्या वायव्येस 27.3 किमी अंतरावर आहे. खाडी खारफुटीच्या जंगलांनी वेढलेली आहे आणि दरवर्षी जानेवारी ते मार्च पर्यंत विविध स्थलांतरित पक्ष्यांचे स्वागत करते. फ्लेमिंगोसह असंख्य जाती पाहिल्या जाऊ शकतात.
  • लोणावळा: पांडव कुंडच्या आग्नेय 72 किमी अंतरावर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. पर्यटनाबरोबरच ह्या ठिकाणी मुंबई तसेच पुण्यातील पर्यटकांसाठी भरपूर आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक आकर्षक बनते कारण या हंगामात अनेक धबधबे दिसतात. हे मुंबई तसेच पुणे आणि आसपासच्या भागातील लोकांसाठी एक लोकप्रिय शनिवार रविचारच्या सुट्टीत बाहेर जायचे ठिकाण आहे.

रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा  

पांडव कुंड धबधब्याला रस्त्याने आणि रेल्वेने जात येते. खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. हे मुंबईपासून रस्त्याने 29. 5 किमी दूर आहे.

जवळचे रेल्वे स्टेशन: जर कोणी मुंबईहून उपनगरीय गाड्यांनी प्रवास करत असेल तर खारघर 7.3 किमी (20 मिनिटे) आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी ठाणे 29 किमी (1 तास 16 मिनिट) हे जवळचे स्टेशन आहे.

जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 36.5 किमी (1 तास 22 मिनिटे)

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल

खारघर रेल्वे स्थानकापासून पांडव कुंड धबधब्यापर्यंत काही लहान फास्ट फूड हॉटेल आहेत. महाराष्ट्रीयन जेवण हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. खारघरमध्ये इतर मल्टीक्युझिन पर्यायही उपलब्ध आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन

ह्या धबधब्याच्या भोवती दाट जंगल असल्याने राहण्यासाठी जागा आणि पायाभूत सुविधा येथून थोड्या लांब आहेत.

खारघर रेल्वे स्थानकाजवळ अनेक हॉटेल्स आहेत.

वाटेत काही रुग्णालये आहेत. पांडव कुंडापासून 8 ते 10 मिनिटांच्या अंतरावर.

सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस बेलापूर सीबीडी मध्ये 6.5 किमी अंतरावर आहे.

सर्वात जवळचे पोलीस स्टेशन बेलापूर सीबीडी मध्ये 6.5 किमी अंतरावर आहे.

जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट

खारघर मधील एमटीडीसी रेसिडेन्सी धबधब्यापासून 9 किमी अंतरावर आहे.

स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना

पांडव कुंड धबधब्यांकडे जाण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हा उत्तम काळ आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिवृष्टीच्या वेळी जाणे टाळले पाहिजे.

परिसरात बोलली जाणारी भाषा

इंग्रजी, हिंदी आणि मराठी.