• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

राजमाची किल्ला

महाराष्ट्रातील पुणे जिल्हातील सह्याद्रि पर्वत रांगांमध्ये राजमाची हा किल्ला आहे. लोणावळा या थंड हवेच्या प्रसिद्ध ठिकाणाजवळ हा किल्ला आहे. महाराष्ट्र राज्यात राजमाची हे अतिशय लोकप्रिय असे गिर्यारोहणाचे ठिकाण आहे.

जिल्हा/प्रांत  

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास       

राजमाची किल्ल्याचा २००० वर्षाचा इतिहास आहे. ही संरक्षक वास्तूकला प्रामुख्याने बोर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी उभी केली गेली. या किल्ल्याच्या परिसरात भव्य तटबंदी, भक्कम भिंती, भव्य महाद्वारे, रहिवासी इमारती, पाणी पुरवठा, सरकारी वास्तू आणि पळून जाण्यासाठी गुप्त भुयारे आहेत. येथे काळभैरवचे एक फक्त दगडाचे बनवलेले देऊळ आहे. हे श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ल्याच्या मधल्या फटीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी साम्राज्यातील महत्वाच्या किल्ल्यातील एक अशी त्याची ख्याती आहे. शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये नवीन बांधणी करून या किल्ल्याचा विस्तार केला. हा किल्ला सह्याद्रीतील सोप्या बांधणीतील एक किल्ला मानला जातो. या किल्ल्याने अनेक राजवटी पहिल्या.

हा किल्ला साधारणत: इ.स. १७०४ ते १७०५ मध्ये मुघल साम्राज्याच्या ताब्यात होता. नंतर मराठ्यांनी त्याचा ताबा घेतला. राजमाची किल्ल्याने मराठा साम्राज्याचा अस्त आणि ब्रिटिश साम्राज्याचा उदय पहिला. इ.स. १८१८ मध्ये हा गड ब्रिटिश साम्राज्याच्या ताब्यात गेला.  राजमाची पठराच्या पश्चिमेला कोंढाणा येथील प्राचीन बुद्ध गुंफांचे विशाल दर्शन होते. सदर गुंफा इ.स. च्या दुसर्या शतकात कोरल्या गेल्या असे मानले जाते. या परिसरात पावसाळ्यात सौंदर्याचा वेगळाच आविष्कार घडतो. या काळात येथे अनेक प्रपात, प्रवाह, आणि हिरवीगार जंगले, कुरणे, आसमंतातील सौन्दर्य संपन्न करीत असतात. पाऊस पडण्यापूर्वी काजव्यांचे सुंदर दृश्य नजरेत येते.

भूगोल         

पुण्याहून मुंबईला जाताना घाटाच्या अगदी सुरवातीला राजमाची पॉइंट आहे. हा लोणावळ्या पासून ६. ५ किमी दूर आहे. हा किल्ला महाराष्ट्राच्या सह्याद्रि पर्वत रांगेचा एक भाग आहे. या किल्ल्याची ऊंची ३६०० फुट आहे. राजमाची किल्ल्यात दोन बालेकिल्ले आहेत. श्रीवर्धन किल्ला आणि मनरंजन किल्ला अशी त्यांची नावे आहेत. श्रीवर्धन किल्ल्यावर टेहळणीची अति उंच जागा आहे. हा ९१४ मिटरवर उभा आहे. यावरून या क्षेत्राचे स्वच्छ आणि स्पष्ट दृश्य दिसते. तर मनरंजन किल्ला ८३३ मीटर्स वर उभा आहे. त्यावरूनही श्रीवर्धनच्या बरोबरीनेच श्वास रोखून धरणारी दृश्य दिसतात.

हवामान       

या परिसरात वर्षभर उष्ण – कोरडी हवा असते. सरासरी तापमान १६-३३ अंश से. असते.

एप्रिल आणि मे हे अति उष्ण महीने असतात. यावेळी तापमान ४२ अंश से. असते.

हिवाळाही कडक असतो आणि यावेळी रात्रीचे तापमान १० अंश से. पर्यन्त खाली येऊ शकते. पण दिवसाचे सरासरी तापमान २६ अंश से. असते. या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारण ४००० मिमी असते.

करण्याजोग्या गोष्टी  

राजमाची किल्ल्यावरील खालील स्थळे किंवा दृश्ये यांचा आनंद पर्यटक घेऊ शकतील. :

●        या किल्ल्यात काही जागा खूप चांगल्या आहेत. उत्तरेला मदन पॉइंट, धाक बाहिरी आणि भीमशंकर, दक्षिणेला कताळधार, लोणावळा, कर्जत यांची भूदृश्ये आहेत.

●        थंड हवेच्या ठिकाणांना छेदणारी दारीही दिसते. पुढे वळताच वालवण धरण, तुंगरली धरण आणि शेवटी ड्युक्स नोज सुद्धा दिसेल. श्रीवर्धन किल्ल्याच्या उजवीकडे माकडांची टेकडी दिसेल.

●        तुमच्या डाव्या बाजूला दक्षिणेकडे काटधारा प्रपाताची झलक दिसेल. पावसाळ्यात जोडीची थंड हवेची ठिकाणे खंडाळा लोणावळाही दिसतील.

●        येथील ट्रेक संपन्न निसर्गाने भरलेला आहे. येथील जंगले अनेक पक्षी, सरडे, आणि किड्यांचे माहेर घर आहे. संध्याकाळ नंतर चमकणारे हे किडे एका जादूच्या जगात घेऊन जातात.

●        तुम्ही योग्य वेळी ट्रेक ला जा. मान्सूनच्या आधी काजव्यांचे मनोहारी दृश्य तुम्हाला दिसेल.

         

नजीकची पर्यटन स्थळे      

राजमाची किल्ल्याच्या जवळ असलेल्या खालील स्थळांना पर्यटक भेट देऊ शकतात. :

●        धाक बाहिरी गुंफा: (५४ किमी) सह्याद्रि पर्वत रांगात ही गुंफा आहे. पुणे जिल्ह्यातील मळवली गावापासून दूर जांभिवली गावाजवळ ही गुंफा आहे.

●        उदय सागर तलाव (१ किमी): तुम्ही उदय सागर या पाणलोट भागाला भेट देऊ शकता. साधारण २०० वर्षापूर्वी हा बांधला गेला. उदयवाडी बसने या गावाच्या जवळ १. ५ किमी वर हा तलाव आहे. हा तलाव वन्य विभागातच आहे.

●        शिरोटा लेक कॅम्पिंग: (५. ३ किमी) हा कॅम्प लोणावल्या पासून ११ किमी वर आहे. पावसाळ्यात हा तलाव भरून वाहू लागतो. हा लोणावळ्याच्या बाजूने जाताना वाळवंड फोर्क या स्थांनाच्या अगदी जवळ आहे.

●               कातळधार धबधबा रॅपलिंग: (६ किमी) पावसाळा सुरू होताच काही दिवसातच कातळधार प्रपात या विस्मयकारक जागेचे दरवाजे जणू उघडतात. हा धबधबा खडकाच्या सुळक्यावरून कोसळतो. हाच याच्या नावाचा अर्थ आहे. हा ३५० फुट कोसळणारा प्रपात तुमचे केवळ शारीरिक सामर्थ्यच नाही तर मानसिक सामर्थ्यही तपासतो.

पर्यटन स्थळी कसे जावे, (रेल्वे, विमान, बस)

अंतर आणि वेळ यासह         राजमाची किल्ला मुंबईहून ३१४ किमी (५ तास २० मिनिटे) आहे. पुण्याहून १७१ किमी (३ तास २० मिनिटे) आणि लोणावळ्याहून १७ किमी ( २० मिनिटे)

तुम्ही मुंबईहून लोकल ट्रेनने पुण्याकडे येताना कर्जत किंवा लोणावळ्याला उतारा. लोणावळा स्टेशन पासून तुंगारली धारणापर्यन्त साधारण ४ किमी रीक्षेनेही जाता येते. तुंगारली ते उधेवाडी हे उरलेले अंतर १६ किमी पायी जावे लागते.

बस किंवा खाजगी वाहनांसाठी मुंबई ते राजमाची २ मार्ग आहेत. तुम्ही कोंढण्या पर्यन्त वाहनाने जाऊ शकता आणि मग ३-४ तास बरेचसे अंतर चालून राजमाचीला पोचू शकता.

दूसरा मार्ग पुणे लोणावळा येथून जातो. येथून तुम्ही उधेवाडी या पायथ्याच्या गावा पर्यन्त गाडीने जाऊ शकता. आणि जवळच्या वाटेने चढत ३०-४० मिनिटात पोचू शकता.

राजमाची साठी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ हेच जवळचे विमानतळ आहे. १७१ किमी. येथून तुम्ही कर्जत किंवा लोणावळ्याला ट्रेन पकडू शकता. पुणे आंतर राष्ट्रीय विमानतळ राजमाची पासून १७३ किमी दूर आहे.

खास खाद्य पदार्थ आणि हॉटेल     

पायथ्याच्या उधेवाडी या गावात गावकरी लक्षपूर्वक घरगुती जेवण तुमच्यासाठी बनवतील. पुष्कळदा अंडा चिकन करी किंवा उसळ, डाळ भाकरी आणि भात बनवतात. तुम्ही खाण्याच्या विविध पर्यायांची निवड करू शकता. जसे पोहे, भजी, मॅगी, उत्साहवर्धक पेये, जसे लिंबू पानी, कोकम सरबत मागवु शकता. तुम्हाला मिसळपाव, वडापावही मिळू शकतो. अन्न साधेच असते पण त्याला विशिष्ट मराठी स्वाद असतो. हा दमविणार्‍या मार्ग क्रमणानंतर विश्रांतीचा थांबा असतो.

हॉटेल हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, पोलिस स्टेशन

  • किल्ल्या जवळ स्थानिक हॉटेल्स आणि रिसॉर्टस आहेत.
  • लोणावळ्यातील यश हॉस्पिटल पायथ्याच्या उधेवाडी पासून १८ किमी अंतरावर आहे.
  • जवळचे पोस्ट ऑफिस – लोणावळा १६ किमी दूर आहे.
  • लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन राजमाची पायथ्या पासून १८ किमी दूर आहे.

एमटीडीसी चे जवळचे रिसॉर्ट

लोणावळा रोड जवळ कार्ला एमटीडीसी रिसॉर्ट उपलब्ध आहेत. 

भेट देण्याचे नियम आणि भेट देण्यास उत्तम महिना        

जरी ही जागा वर्षभर भेट देण्यासाठी सुंदर जागा आहे तरी राजमाचीला जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हा कालावधी उत्तम आहे या काळात किल्ला चढताना पाण्याचे झरे आणि हिरवळ तुमचे स्वागत करतात. जेव्हा पूर्ण प्रकाश असतो ती दुपार आणि संध्याकाळची वेळ ही किल्ल्यावर जाण्यास योग्य वेळ आहे. रात्रीच्या वेळी गाडी चालवणे हे तुलनेने कठीण होते. 

या भागात बोलल्या जाणार्‍या भाषा         

इंग्रजी, हिन्दी, मराठी