श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुणे शहराचा अभिमान आणि सन्मान आहे. भारत आणि जगाच्या प्रत्येक भागातून लोक दरवर्षी गणपतीची प्रार्थना करण्यासाठी इथे येतात.
जिल्हा/विभाग
पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
ऐतिहासिक माहिती
या मंदिराची स्थापना दगडूशेट हलवाई या स्थानिक मिठाई विक्रेत्याने केली होती, जो १८९३ मध्ये त्यांच्या व्यवसायामुळे श्रीमंत झाला होता. दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांचे दोन मुलगे १८९२ च्या प्लेगमध्ये गमावले होते. दरवर्षी ते पूर्ण गणपती उत्सव भक्तिभावाने साजरा करायचे आणि केवळ दगडूशेठ कुटुंबच नाही तर त्यांचे शेजारीसुद्धा. नंतरच्या काळात, जेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामासाठी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणपती उत्सवाला सार्वजनिक उत्सव बनवले, तेव्हा दगडूशेठ गणपती पुण्यातील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय स्थळ बनले.
आज, गणपतीच्या आशीर्वादाने, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट एक अशी संस्था बनली आहे जी मानवतेच्या सेवेद्वारे परमेश्वराची उपासना करण्यात धन्यता मानते.
हे मंदिर एक सुंदर बांधकाम आहे आणि ज्याला १०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहासाची जोड आहे. जय आणि विजय, संगमरवरी बनवलेले दोन प्रहरी, बाहेरच सर्वांचे लक्ष वेधून घेतात. बांधकाम इतके मोकळे आहे की सुंदर गणेश मूर्तीसह मंदिरातील सर्व कार्यवाही बाहेरूनही दिसू शकतात. गणेश मूर्ती २.२ मीटर उंच आणि १ मीटर रुंद आहे. ती सुमारे ४० किलो सोन्याने सुशोभित केलेली आहे. दैनंदिन पूजा, अभिषेक आणि गणपतीची आरती हे सर्व उपस्थित राहण्यासारखे आहे. गणेशोत्सव काळात मंदिराची सजावट अप्रतिम असते. श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट मंदिराच्या देखभालीचे काम पाहते. मंदिर शहराच्या मध्यभागी आहे आणि स्थानिक बाजार देखील मंदिराजवळच आहे. विविध सांस्कृतिक उपक्रम जसे संगीत मैफिली, भजन आणि अथर्वशीर्ष पठण ट्रस्टद्वारे आयोजित केले जातात.
मंदिर हेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी तसेच सांस्कृतिक विकासासाठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे. ट्रस्ट लहान व्यवसायांना आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य करते आणि वृद्धाश्रम देखील चालवते.
भौगोलिक माहिती
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे शहरात आहे. हे पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपासून अंदाजे ४.२ किमी अंतरावर आहे.
हवामान
• या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
• एप्रिल आणि मे हे पुण्यातील सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
• हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
• पुणे विभागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो.
करण्यासारख्या गोष्टी
• दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणपतीला समर्पित पुण्याचे सर्वात भेट दिले जाणारे प्रसिद्ध मंदिर आहे.
• आंबा महोत्सव अक्षय्य तृतीयेला साजरा केला जातो.
• वसंत पंचमीनिमित्त साजरा होणारा मोगरा सण.
• गुढीपाडव्याच्या सणापासून ते रामनवमीपर्यंत एक संगीत उत्सव देखील साजरा केला जातो जो येथे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतो.
जवळची पर्यटनस्थळे
येथे विविध ठिकाणे आहेत जिथे कोणीही भेट देऊ शकते.
• शनिवारवाडा (१.१ किमी)
• विश्रामबाग वाडा (०.८ किमी)
• आगा खान पॅलेस (१०.५ किमी)
• राजा दिनकर केळकर संग्रहालय (१.६ किमी)
• महादजी शिंदे छत्री (६.७ किमी)
रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे
• रस्त्याने:- हे पुण्यातील बुधवार पेठेतील शिवाजी रोडवर आहे. मुंबईपासून मंदिरापर्यंतचे अंतर १५० किमी आहे आणि ते साधारण २ तास ४५ मिनिटात गाठता येते. MSRTC बस उपलब्ध आहेत.
• रेल्वेने:- सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन शिवाजीनगर आहे जे मंदिरापासून सुमारे २.६ किमी अंतरावर आहे.
• हवाई मार्गाने:- सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे मंदिरापासून सुमारे ११.२ किमी अंतरावर आहे.
खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स
जवळच्या कोणत्याही स्थानिक रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीय जेवण आणि पदार्थ मिळतात.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
• या मंदिराजवळ राहण्याच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत.
• जवळचे पोलीस स्टेशन विश्रामबाग वाडा पोलीस स्टेशन (०.६२ किमी) आहे.
• जवळचे हॉस्पिटल सूर्य सह्याद्री हॉस्पिटल (१.५ किमी) आहे.
जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट
MTDC पानशेत रिसॉर्ट ३९.९ किमी अंतरावर जवळचे रिसॉर्ट आहे.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ
वर्षाच्या कोणत्याही वेळी या मंदिराला भेट देता येते.
मंदिर सकाळी ६.०० वाजता उघडते आणि रात्री ११.०० वाजता बंद होते.
या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी.
Gallery
How to get there

By Road
हे पुण्यातील बुधवार पेठेतील शिवाजी रोडवर आहे. मुंबई ते मंदिराचे अंतर 150 किमी आहे आणि ते 2 तास 45 मिनिटांच्या जवळ असावे. MSRTC बसेस उपलब्ध आहेत

By Rail
जवळचे रेल्वे - किनवट रेल्वे स्टेशन (49 KM)

By Air
सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे मंदिरापासून सुमारे 11.2 किमी अंतरावर आहे.
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
No Hotels available!
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
diot@maharashtratourism.gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS