• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक

श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर' महाराष्ट्रातील रायगडमध्ये आहे. गणपतीच्या भक्तांसाठी हे पवित्र स्थान मानले जाते. गणपतीच्या आठ महत्त्वाच्या रूपांपैकी एक आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असल्याने हे भेट देण्यासारखे ठिकाण आहे.
जिल्हा/विभाग    

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
मनमोहक आणि नयनरम्य निसर्गाने वेढलेले, बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील दैवी अष्टविनायक (आठ विनायक - गणेशाचे एक रूप) मंदिरांपैकी एक. हे मंदिर गणपतीचे एकमेव रूप आहे जे त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते आणि त्याची पूजा केली जाते आणि मूर्ती ब्राह्मण रुपात सजवलेली आहे; हे वैशिष्ट्य गणेशाच्या इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. 
दंतकथा सांगते की, कल्याण नावाच्या व्यावसायिकाचा बल्लाळ नावाचा मुलगा. कल्याण त्याची पत्नी इंदुमती गणपतीच्या उपासनेसाठी सर्व काही विसरले, अगदी त्यांचे दुःखही. मुलाच्या भक्तीने प्रेरित गणेश स्वतः प्रकट झाले आणि त्याने मुलाला आशीर्वाद दिला की लोक बल्लाळेश्वर, बल्लाळचे भगवान म्हणून त्याचे नाव घेऊन गणेशाची भक्ती करतील.
हे मंदिर मुळात लाकडी बांधकामाचे होते परंतु १७६० मध्ये श्री. फडणीस यांनी एका दगडी बांधकामात रुपांतर केले. हे नवीन मंदिर त्याच्या बांधकामादरम्यान शिसे आणि सिमेंट मिसळून 'श्री' अक्षराच्या आकारात तयार केले गेले. त्याची रचना पूर्व दिशेला अशा प्रकारे केली गेली होती की सूर्य उगवताच सूर्याची पहिली किरणे गणपतीच्या मूर्तीवर पडतील. वसई आणि सस्तीमध्ये पोर्तुगीजांच्या पराभवानंतर पेशव्यांच्या 'चिमाजी अप्पाने' परत आणलेली घंटा या मंदिरात आहे. मंदिराचा मुख्य मंडप (हॉल) १२ मीटर लांब आणि ६.१ मीटर रुंद आहे. यात सायप्रसच्या झाडांसारखे आठ खांब आहेत. मंदिरात दोन गाभारे आहेत. आतील गाभारा ४.६ मीटर उंच आणि बाहेरील गाभारा ३.७ मीटर उंच आहे. परिसरात दोन तलाव देखील आहेत.
गणपतीची स्वयंभू मूर्ती असल्याचे मानले जाते. हे ठिकाण पश्चिम बंदरांना दख्खनच्या पठारावरील व्यापारी केंद्रांशी जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर आहे.

भौगोलिक माहिती    
बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावातील सुधागड तालुक्यात आहे. 

हवामान    
या भागातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
कोकणात हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी      
मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तांसाठी स्वर्ग आहे. मुख्य हॉल व्यतिरिक्त, इतर ठिकाणीही भेट देणे आनंददायी ठरते. 
दोन तलाव आणि दोन अभयारण्य. गणेश चतुर्थीच्या सणाला (गणपतीच्या जन्माचा उत्सव) भेट देणार असाल तर इथे अनेक कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात.

जवळची पर्यटनस्थळे     
लोकांना फिरण्यासाठी इथे अनेक ठिकाणे आहेत
•    मंदिराजवळील स्थानिक बाजारपेठ
•    सुधागड किल्ला (११ किमी)
•    गरम पाण्याचा झरा (४५ किमी)
•    थानाळे येथील बौद्ध लेणी (१४ किमी)
•    खडसंबळे येथील बौद्ध लेणी (१७ किमी)
•    अलिबाग (५५.१ किमी)
•    लोणावळा हिल स्टेशन (५६.६ किमी)
•    रायगड किल्ला (६७.६ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    रस्त्याने - मुंबईहून पनवेल आणि खोपोली मार्गे, पाली १२४ किमी अंतरावर आहे. कर्जत पासून, पाली सुमारे ३० किमी आहे. येथे पोहोचण्यासाठी कोणीही बेंगळुरू - मुंबई महामार्ग किंवा मुंबई - पुणे महामार्ग वापरू शकतो.
•    जवळचे रेल्वे स्टेशन: कर्जत, ३० किमी.
•    जवळचे विमानतळ: मुंबई (१०५ किमी) किंवा पुणे ही सुलभ विमानतळे आहेत

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
परवडणाऱ्या किमतीत अस्सल महाराष्ट्रीयन जेवण सहज उपलब्ध आहे. स्थानिक वैशिष्ट्य उकाडीचे मोदक परंपरेने भगवान गणेशाशी संबंधित आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
पाली भक्त निवास येथे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची चांगली सोय आहे. इतर हॉटेल्स आणि मूलभूत सुविधा देखील उपलब्ध आहेत. 

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
सर्वात जवळचे एमटीडीसी रिसॉर्ट हे टूरिस्ट पॉईंट हॉटेल आहे, जे मंदिरापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    मंदिरात छायाचित्रण करण्यास सक्त मनाई आहे.
•    सकाळी ५.३० पासून ते रात्री १०.०० पर्यंत मंदिराची वेळ आहे. 
•    पर्यटनासाठी ऑगस्ट ते मार्च हा सर्वोत्तम महिना आहे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी