सिद्धिविनायक सिद्धटेक - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
सिद्धिविनायक सिद्धटेक
सिद्धटेकच्या अष्टविनायकाला सिद्धिविनायक म्हणतात. सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात आहे. सिद्धटेक हे अष्टविनायकाच्या सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे.
जिल्हा/विभाग
अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
ऐतिहासिक माहिती
सिद्धेश्वराचे सिद्धटेक मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. पौराणिक कथेनुसार मूळ मंदिर स्वतः भगवान विष्णूने बांधले असे मानले जाते.
मंदिराची सध्याची रचना टप्प्याटप्प्याने बांधण्यात आली आहे. सिद्धटेक मंदिराचा गाभारा १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात अहिल्याबाई होळकरांनी बांधला. नगरखान्यात नगारे आहेत जे सरदार हरिपंत फडके यांनी पेशव्यांकडून बांधून घेतले होते. बाह्य सभामंडप सभागृह बडोद्याच्या मिरल नावाच्या एका जमीनदाराने बांधले होते जे १९३९ मध्ये तुटून पडले आणि १९७० पर्यंत त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. सिद्धटेक येथील मूर्ती खरोखरच अद्वितीय आणि महत्वाची आहे.
भौगोलिक माहिती
सिद्धटेक भीमा नदीच्या काठावर आहे आणि मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे.
हवामान
• या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
• एप्रिल आणि मे हे पुण्यातील सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
• हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
• या भागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो.
करण्यासारख्या गोष्टी
मंदिराच्या आसपास आणि टेकडीला प्रदक्षिणा सुद्धा घालता येते.
या मंदिराजवळ अनेक दुकाने आहेत जिथे आपण विविध स्मृतिचिन्हे खरेदी करू शकता.
जवळची पर्यटनस्थळे
पर्यटक भेट देऊ शकतात अशी विविध ठिकाणे आसपास आहेत.
• भिगवण पक्षी अभयारण्य (३० किमी)
• खंडोबा मंदिर जेजुरी (७७ किमी)
• अष्टविनायक मोरगाव (५७.३ किमी)
• उजनी धरण (५५.७ किमी)
• पलसनाथ मंदिर (३५.८ किमी)
• अहमदनगर किल्ला (८८.९ किमी)
रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे
• हवाई मार्गाने - जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (१०३ किमी) आहे.
• ट्रेनने - दौंड रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. (१८ किमी)
• रस्त्याने - राज्य परिवहन बस सर्व राज्य परिवहन बस स्टँड वरून उपलब्ध आहेत.
खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स
महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण जवळच्या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहे.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
• या मंदिराजवळ विविध निवास सुविधा आहेत.
• मंदिरापासून जवळचे पोलीस स्टेशन दौंड तालुका पोलीस स्टेशन अंदाजे १८ किमी अंतरावर आहे.
• ऍशवूड मेमोरियल हॉस्पिटल हे १८.२ किमी अंतरावर सर्वात जवळचे हॉस्पिटल आहे
पर्यटन मार्गदर्शक (माहिती)
संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटन मार्गदर्शक अष्टविनायक मंदिरांच्या दर्शनासाठी टूर आयोजित करतात.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ
• मंदिर सकाळी ५.३० वाजता उघडते आणि रात्री ९.३० वाजता बंद होते.
• वर्षभर कोणत्याही वेळी या ठिकाणी भेट देता येते.
• इथे गणेश चतुर्थी आणि माघ चतुर्थी हे सण ऑगस्ट आणि फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जातात.
• इथे कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी.
Gallery
How to get there

By Road
By Road - State transport buses are available from all state transport bus stands.

By Rail
By Train - Daund railway station is the nearest railway station. (18 KM)

By Air
By Air - Nearest airport is Pune International Airport (103 KM).
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
No Hotels available!
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
diot@maharashtratourism.gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS