• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर

स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर हे गौतमी नदीच्या काठावर एक धार्मिक मंदिर आहे. यात आध्यात्मिक गुरु स्वरूपानंद स्वामींची समाधी आहे.
जिल्हा/विभाग    

पावस तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर हे १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधी घेतल्यानंतर स्वामी स्वरूपानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.
स्वामीजींचे नाव रामचंद्र विष्णुपंत गोडबोले होते, पण त्यांना प्रेमाने 'आप्पा' किंवा 'भाऊ' म्हटले जायचे. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस येथे झाला. त्यांना साहित्याची आवड होती आणि मराठी आणि संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या अठराव्या वर्षी रामभाऊंनी महात्मा गांधी (राष्ट्रपिता) च्या मार्गावर चालायला सुरुवात केली होती. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी पुण्यातील गुरु सद्गुरू बाबामहाराज वैद्य यांच्याकडून दीक्षा घेतली. तेव्हापासून रामचंद्र उर्फ स्वामी स्वरूपानंद यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यांनी दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवतम, अभंगांमधून अनेक संत आणि उपनिषदांतून तत्त्वज्ञान शिकले होते. कालांतराने, त्यांचे अनेक अनुयायी अनुसरण करत राहिले. वयाच्या ७० व्या वर्षी स्वामीजींनी समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी स्वामीजी ४० वर्षे पावस इथे राहिले. त्यांचे मूळ निवासस्थान, अनंत निवास अजूनही सुस्थितीत आहे.
मंदिर हे अतिशय निर्मळ आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. ज्या ठिकाणी स्वामीजींनी समाधी घेतली त्या ठिकाणी मुख्य समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. याशिवाय एक छोटेसे गणेश मंदिर आहे. इथले ध्यान सभागृह (मेडिटेशन हॅाल) हे आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे जे लोकांना आंतरिक शांती अनुभवण्यास मदत करते. मंदिराचा परिसर आणि मठ सुस्थितीत आहे.

भौगोलिक माहिती    
पावस कोकणच्या किनारपट्टी आणि डोंगराळ भागांच्या दरम्यान आहे आणि ते मध्यम उंचीवर आहे. रणपार येथे उगम असलेली गौतमी नदी पावसातून दुथडी भरून वाहते.

हवामान    
या भागातील प्रमुख ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनार पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा फार गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
कोकणात हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी      
मंदिर खूप सुंदर आहे आणि मंदिराच्या परिसरात खूप सकारात्मक उर्जा आणि शांतता मिळते. येथे एक ध्यान खोली (मेडिटेशन रूम) आणि गणपतीची मूर्ती आवळ्याच्या झाडावर कोरलेली आहे. दुपारची आरती खिचडी प्रसादासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरातील दुकाने उत्कृष्ट मध, धार्मिक पुस्तके, भक्ती गीतांच्या सीडी विकण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

जवळची पर्यटनस्थळे     
•    अनंत निवास (१.१ किमी)
•    श्री सोमेश्वर मंदिर (२.२ किमी)
•    कुतुब हजरत शेख मुहम्मद पीर काद्रिया रेहमतुल्लाहलैही दर्गा (२.५ किमी)
•    भगवान परशुराम मंदिर (२.८ किमी)
•    गणेशगुलेची प्राचीन पायरी (५.८ किमी)
•    गणेश मंदिर (५.८ किमी)
•    गणेशगुले बीच (६.१ किमी)
•    श्री महाकाली देवी मंदिर (६.१ किमी)
•    नारायण लक्ष्मी मंदिर (६.७ किमी)
•    पूर्णगड किल्ला (९ किमी)
•    रत्नदुर्ग किल्ला (२१.२ किमी)
•    कोकणगभा कृषी पर्यटन (३३.४ किमी)
•    पनवेल धरण (३३.८ किमी)
•    गणपतीपुळे मंदिर (३९.६ किमी)
•    राजापूर गंगा (५४.६ किमी)
•    विजयदुर्ग किल्ला (७९.६ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    जवळचे विमानतळ: कोल्हापूर विमानतळ (१४६ किमी)
•    जवळचे रेल्वे स्टेशन: रत्नागिरी रेल्वे स्टेशन (२४.५ किमी)
•    रस्त्याने: पावस एसटी स्टँड (१.३ किमी)
•    पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी आणि इतर अनेक ठिकाणांहून पावसला जाण्यासाठी राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
•    कोकणी जेवण आणि खाद्यप्रकार इथे प्रचलित आहे.
•    आंबा पोळी आणि फणस पोळी सारख्या वाळलेल्या मिष्टान्नासाठी देखील हे ओळखले जाते.
•    पावस हापूस आंबे, काजू आणि नारळ यासाठी ओळखले जाते. 

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे हॉटेल्स, लॉज, होमस्टे इ.
•    जवळचे पोस्ट ऑफिस: पावस पोस्ट ऑफिस (१.७ किमी)
•    जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी: १७.२ किमी
•    जिल्हा पोलीस स्टेशन: १७.९ किमी

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
MTDC गणपतीपुळे बीच अँण्ड आणि सी-साईड रिसॉर्ट (४०.३ किमी)

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
पावसला भेट देण्याचा उत्तम काळ जुलै ते एप्रिल आहे कारण हवामान थंड आणि हवेशीर असल्यामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवता येते.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी आणि मराठी.