• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Banner Heading

Asset Publisher

तारकर्ली समुद्रकिनारा

तारकर्ली हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हा कोकण विभागातील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या किनाऱ्याभोवती नारळ आणि सुपारीची झाडे आहेत. तारकर्लीच्या हाऊसबोट्स केरळ बॅकवॉटर आणि काश्मीरच्या डल लेकची अनुभूती देतात. तारकर्ली समुद्रकिनारा स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंगसाठी प्रसिद्ध आहे.

जिल्हा/विभाग :

सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास  :

तारकर्ली हे महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे. हा किनारा स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनारे आणि वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे. नारळ, काजू तसेच सुपारीच्या झाडांनी संपन्न आहे. काही वर्षांपूर्वी हा कोकण प्रदेशातील क्वीन-बीच म्हणून घोषित झाला होता. अलिकडच्या वर्षांत हे जलक्रीडा उपक्रमांच्या दृष्टीने भारतातील एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. तारकर्ली आणि आसपासची ठिकाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांच्या मदतीने स्नॉर्केलिंग आणि स्कूबा डायव्हिंग सारखे उपक्रम करतात. इथे एक आंतरराष्ट्रीय स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र आहे जे एमटीडीसी द्वारे चालवले जाते.

भूगोल :

तारकर्ली हे दक्षिण कोकण विभागातील कोलंब खाडी आणि कार्ली नदी दरम्यानची एक किनारपट्टी आहे तिच्या एका बाजूला हिरवे सह्याद्री पर्वत आणि दुसरीकडे निळा अरबी समुद्र आहे. हे सिंधुदुर्ग शहराच्या पश्चिमेस ३३ किमी, कोल्हापूरच्या दक्षिण पूर्वेस १६२ किमी आणि मुंबईच्या दक्षिणेस ४९८ किमी आहे. 

हवामान :

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी  :

तारकर्ली हे पॅरासेलिंग, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बनाना बोट राईड्स, जेट-स्कीइंग इत्यादी वॉटरस्पोर्ट्स उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.

हाऊसबोट राइडिंग तारकर्ली मधील सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक आहे.

हे डॉल्फिन स्पॉटिंग तसेच पाण्याखालील जवळजवळ ३५०-४०० वर्षे जुने कोरल आणि जैव विविधता संशोधनासाठी प्रसिद्ध आहे.

जवळची पर्यटनस्थळे  :

तारकर्लीसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.


सिंधुदुर्ग किल्ला: तारकर्ली जवळचा हा किल्ला अवश्य भेट द्यावा असा आहे. किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता आणि पोर्तुगीजांच्या स्थापत्यशैलीने प्रभावित आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता-पायाचे ठसे दिसतात.
त्सुनामी बेट: देवबाग संगम रस्त्याने तारकर्लीपासून ८.३ किलोमीटर अंतरावर आहे.
मालवण: तारकर्लीच्या ६  किलोमीटर उत्तरेस असून, काजू कारखाने आणि मासेमारी बंदरासाठी प्रसिद्ध आहे.
पद्मगड किल्ला: हा किल्ला तारकर्लीच्या वायव्येस २.३ किमी अंतरावर आहे.
रॉक गार्डन मालवण: येथे समुद्राच्या तळाशी प्रवाळांची (corals) वसाहत दिसते. हि प्रवाळं तीन ते चारशे वर्षांइतकी जुन्या असल्याचे मानले जाते.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे :

तारकर्ली रस्त्याने प्रवास करता येतो, हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहन, खासगी आणि लक्झरी बसेस रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा या शहरांमधून उपलब्ध आहेत.

जवळचे विमानतळ: चिपी विमानतळ सिंधुदुर्ग (१६ किमी), दाबोलिम विमानतळ गोवा (१३४ किमी)

जवळचे रेल्वे स्टेशन: सिंधुदुर्ग ३१ किमी (४६ मिनिटे), ३२ किमी  (५५ मिनिटे) आणि कणकवली ४९ किमी (१ तास ११ मिनिटे)
 

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स  :

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने सी-फुड येथील वैशिष्ट्य आहे. तसेच, हे सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबई आणि गोव्याशी जोडलेले आहे, इथल्या  रेस्टॉरंट्स मध्ये विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. मालवणी जेवण हे इथले वैशिष्ट्य आहे ज्यात नारळ वापरून बनविलेल्या मसालेदार ग्रेव्ही आणि मासे समाविष्ट आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन  :

तारकर्लीमध्ये विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.

तारकर्लीपासून ५ किमी अंतरावर मालवणमध्ये रुग्णालये उपलब्ध आहेत.

सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस मालवण मध्ये ४ किमी अंतरावर आहे.

सर्वात जवळचे पोलीस स्टेशन मालवण मध्ये ५.२ किमी अंतरावर आहे.
 

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट :

MTDC रिसॉर्ट तारकर्ली मध्ये आहे.

 

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ  :

हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे. 
जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, मालवणी