• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

राजीव गांधी प्राणीसंग्रहालय किंवा कात्रज प्राणीसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. हे कात्रज, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य येथे आहे. हे प्राणीसंग्रहालय पुणे महानगरपालिकेद्वारे संचालित आणि देखभाल केले जाते. १३० एकर (५३ हेक्टर) प्राणिसंग्रहालयाचे तीन भागांमध्ये विभाजन केले आहे: प्राणी अनाथालय, स्नेक पार्क आणि प्राणीसंग्रहालय. यात कात्रज तलावाची ४२ एकर जमीन (१७ हेक्टर) समाविष्ट आहे.

जिल्हे/प्रदेश     
कात्रज पुणे महाराष्ट्र

इतिहास    
१९५३ मध्ये पुणे महानगरपालिकेने सुमारे ७ एकर (२.८ हेक्टर) जागेवर पेशवे पार्क बनवले जेथे माधवराव पेशवे यांनी १७७० मध्ये खाजगी प्राणीसंग्रहालय उभारले होते. पुण्यात मध्यभागी पर्वतीच्या पायथ्याशी वसलेल्या या प्राणीसंग्रहालयात पारंपारिक पिंजऱ्यांमध्ये ठेवलेले प्राणी पहावयास मिळतात. १९८६ मध्ये, श्री नीलम कुमार खैरे (उद्यानाचे पहिले संचालक), पुणे महानगरपालिकेच्या मदतीने, कात्रज स्नेक पार्कला राजीव गांधी प्राणी उद्यानात बदलले गेले.
१९९७ मध्ये, भारतीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिक आधुनिक प्राणीसंग्रहालय बनवण्यासाठी, नगरपालिकेने कात्रजमध्ये एक जागा निवडली आणि दुसरे प्राणिसंग्रहालय उभारण्यास सुरुवात केली. हे प्राणीसंग्रहालय १९९९ मध्ये राजीव गांधी प्राणीशास्त्र उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्र म्हणून स्थापित केले गेले आणि सुरुवातीला फक्त सरपटणारे प्राणी, सांबर, स्पॉटेड हरण आणि माकडे यांचा समावेश होता. शेवटी पेशवे पार्कमधील संपूर्ण प्राणी कात्रज येथे प्राणीसंग्रहालयात २००५ मध्ये आणण्यात आले आणि मग पेशवे पार्क बंद करण्यात आले.
उद्यानात जखमी आणि अनाथ प्राण्यांसाठी बचाव केंद्र देखील समाविष्ट आहे. ऑक्टोबर २०१० पासून सदरील केंद्र प्राणी दत्तक योजना चालवित आहे.

भूगोल     
हे उद्यान पुणे-सातारा महामार्गावर पेशवेकालीन कात्रज तलावाच्या काठावर आहे.

हवामान/वातावरण     
हवामान: पावसाळी आणि हिवाळा थंड आणि दमट असतो.

करावयाच्या गोष्टी    
प्राणीसंग्रहालयात सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचे संग्रह आहेत. सस्तन प्राण्यांमध्ये, प्राणीसंग्रहालयात पांढरा वाघ आणि बंगाली वाघ आहे. प्राणीसंग्रहालयातील इतर सस्तन प्राण्यांमध्ये बिबट्या, अस्वल, सांबर, हरण, काळवीट, माकडे आणि हत्ती यांचा समावेश आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय रॉक पायथन, कोब्रा, साप, भारतीय मगर आणि भारतीय स्टार कासव यांचा समावेश आहे आणि मोरांसारखे पक्षी देखील एक वैशिष्ट्य आहे.
स्नेक पार्कमध्ये साप, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि कासवांचा मोठा संग्रह आहे. सापांच्या २२ पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यामध्ये १३ फूट लांब किंग कोब्राचा समावेश आहे. सापांविषयीची माहिती ब्रेलमध्येही दिली आहे. स्नेक पार्कने सापांविषयीची शंका दूर करण्यासाठी आणि सापांविषयीची भीती नष्ट करण्यासाठी अनेक सर्प महोत्सव आणि साप जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. नाग पंचमी दरम्यान, जनजागृती करण्यासाठी उद्यान कार्यक्रमांची व्यवस्था करते. एप्रिल २०१७ मध्ये प्राणिसंग्रहालयाने अशियायी सिंहाच्या एका जोडीचा समावेश होता, त्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या भेटींमध्ये लक्षणीय वाढ झाली.

जवळचे पर्यटन स्थळ    
कात्रज जवळ अनेक ठिकाणे आहेत,
•    सिंहगड किल्ला
•    दगडूशेठ हलवाई मंदिर
•    शनिवार वडा
•    सारस बाग

रेल्वे, हवाई, रस्त्याने (रेल्वे, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा 
हे उद्यान पुणे शहरापासून ८ किमी अंतरावर आहे, कात्रज बस डेपो जवळ. पीएमपीएमएल बसेस स्वारगेटवरून मिळू शकतात. कात्रज डेअरी सुद्धा जवळच आहे. पुणे देशांतर्गत विमानतळ जवळ असल्याने विमानमार्गाने देखील प्रवास करू शकतात. शिवाजी नगर किंवा पुणे रेल्वे स्टेशन हा रेल्वेमार्ग जवळचा आहे.

विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल    
पुणेरी मिसळ, मस्तानी आणि मुख्यतः महाराष्ट्रीयन थालीचे विविध प्रकार आणि चव हे पुणेकरांचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
शहर लहान असल्याने निवासाचे पर्याय अधिक आहेत. कात्रजजवळ राहण्यासाठी आपल्याला अनेक वाजवी किंमतीची हॉटेल्स मिळतात.

जवळचे एमटीडीसी रिझॉर्ट     
कार्ला येथे एमटीडीसीचे रिझॉर्ट ६८ किमी अंतरावर जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर आहे.
     
स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना    
सकाळी ८.०० ते संध्याकाळी ६.०० ही भेट देण्याची वेळ आहे. हिवाळा आणि उन्हाळा हे भेट देण्याचे ऋतू आहेत.

परिसरात बोलली जाणारी भाषा    
मराठी, हिंदी, इंग्रजी.