• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

थेऊर (अष्टविनायक)

'थेऊरचे अष्टविनायक' ज्याला 'थेऊरचे चिंतामणी मंदिर' म्हणूनही ओळखले जाते, हे महाराष्ट्रातील थेऊरमध्ये असलेले गणेश मंदिर आहे. गणपतीच्या महत्त्वाच्या अवतारांपैकी एक असल्याने आणि त्याच्याशी जोडलेली दृढ धार्मिक श्रद्धा, मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांच्या मनाला शांती देणारे आहे.
जिल्हा/विभाग  
 
पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती    
थेऊर एक छोटेसे शहर जे पुण्यापासून जवळ आहे. हे विनायक मंदिरासाठी ओळखले जाते जे श्री चिंतामणी विनायक मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
महाराष्ट्राच्या अष्टविनायक मंदिर तीर्थक्षेत्रात थेऊर चिंतामणी हे पाचवे मंदिर असल्याचे सांगितले जाते. चिंतामणी गणेश 'मनाला शांती देणारे दैवत’ मानले जाते. 
गणपतीच्या परंपरेतील संत 'मोरया गोसावी' हे मंदिर बांधणार होते. असे म्हटले जाते की ते त्यांच्या मूळ गावाहून (मोरगाव) दुसऱ्या गावी प्रवास करताना या मंदिराला बऱ्याचदा भेट देत.  पौर्णिमेनंतर प्रत्येक चौथ्या दिवशी ते मंदिराला भेट देत असत. याच परिसरात भगवान गणेश, भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी देवी लक्ष्मी, भगवान हनुमान आणि इतरांना समर्पित असंख्य लहान देवस्थानांसह गणपतीला समर्पित एक मुख्य मंदिर आहे. त्यात एक लाकडी सभा-मंडप देखील आहे जो १८ व्या शतकात माधवराव पेशवे यांनी बांधला होता. मंदिरात काळ्या दगडाचा पाण्याचा झराही आहे.
येथील गणपतीच्या मूर्तीचे एक अतिशय मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वयंप्रकाशित आहे आणि पूर्वाभिमुख आहे. आणखी एक मनोरंजक वस्तुस्थिती अशी आहे की केवळ देवताच नाही तर या स्थानाचे स्वतःचे असे महत्त्वही आहे. थेऊर मुळा-मुठा नदीच्या काठावर वसले आहे.
पहिले थोरले पेशवे माधवराव, यांनी त्यांचे शेवटचे दिवस याच ठिकाणी घालवले. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे यांनी 'सती' या विधीचा भाग म्हणून जिवंतपणी अग्नीत प्रवेश केला. तिचे स्मारक नदीच्या काठावर या मंदिरापासून जवळ आहे. 

भौगोलिक माहिती    
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यापासून २४ किमी दूर थेउर गावात, हवेली तालुक्यात आहे.

हवामान     
•    या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    या भागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो. 

करण्यासारख्या गोष्टी      
मुख्य मंदिर पाहिल्यानंतर, आवर्जुन पुढील ठिकाणं पहिली पाहिजे: 
•    भगवान महादेव (शिव) मंदिर
•    भगवान विष्णू-लक्ष्मी मंदिर
•    भगवान हनुमान मंदिर
•    परिसरातील स्थानिक बाजारपेठ आणि मंदिर परिसरातील लहान संग्रहालयाला भेट द्या
•    जर गणेश चतुर्थीच्या वेळी भेट देत असेल तर अभ्यागतांना आनंद घेण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आणि आश्चर्यकारक मेळावा इथे आयोजित केला जातो.

जवळची पर्यटनस्थळे     
या मंदिराला भेट देताना अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येते.
•    रामद्र मंदिर – १३.२ किमी, मंदिरापासून ३५ मिनिटे
•    आगा खान पॅलेस – २०.८ किमी, मंदिरापासून अंदाजे ४० मिनिटे  
•    महादजी शिंदे छत्री – २२.६ किमी, मंदिरापासून सुमारे ४४ मिनिटे 

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    थेऊर पुण्यापासून सुमारे २४.५ किलोमीटर अंतरावर आहे. पुणे किंवा मुंबईहून खाजगी किंवा सार्वजनिक वाहनांनी थेऊरला पोहोचता येते. 
•    थेऊरच्या जवळचे रेल्वे स्टेशन २०.५ किमी अंतरावर पुणे रेल्वे स्टेशन आहे.
•    मंदिरापासून जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (२१ किमी) आहे.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
अस्सल महाराष्ट्रीय जेवण जवळच्या रेस्टॉरंट्समध्ये मिळते. 

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    चांगल्या सेवांसह प्रत्येकाला परवडणारे निवास पर्याय इथे सहज उपलब्ध होतात.
•    सय्यद हॉस्पिटल ०.३ किमी अंतरावर सर्वात जवळचे हॉस्पिटल आहे.
•    १३.७ किमी अंतरावर शिक्रापूर पोलीस स्टेशन हे सर्वात जवळचे पोलीस स्टेशन आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
MTDC पानशेत रिसॉर्ट हे ६४ किमी अंतरावर सर्वात जवळचे MTDC आहे.

पर्यटन मार्गदर्शक (माहिती)    
संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटन मार्गदर्शक अष्टविनायक मंदिरांच्या दर्शनासाठी टूर आयोजित करतात.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    मंदिरात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.
•    तुमच्या मालकीच्या वाहनावर २०-३० रुपयांच्या आसपास पार्किंग शुल्क आहे.
•    सकाळी ६.०० ते दुपारी १.०० आणि दुपारी २.०० ते रात्री १०.०० पर्यंत मंदिराची निश्चित वेळ आहे.
•    मंदिराला भेट देण्याचा सर्वात चांगला महिना ऑगस्ट नंतर आहे, तरी वर्षभरात कधीही पर्यटक इथे येऊ शकतात. 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.