• स्क्रीन रीडर प्रवेश
 • A-AA+
 • NotificationWeb

  Title should not be more than 100 characters.


  0

Asset Publisher

वरसोली

वरसोली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले एक समुद्र किनारा असलेले गाव आहे. बर्याच पर्यटकांना माहित नसल्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ कमी असते, म्हणून ते विश्रांतीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या परिसरात सुंदर कॉटेजेस आणि रिसॉर्ट्स आहेत.

जिल्हा/विभाग        

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

वरसोली हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. वरसोलीत भारतीय लष्कराचा नौदल तळ आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १७ व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत नौदल प्रमुख म्हणून काम केले तेव्हा हा तळ उभारण्यात आला. याच्या योग्य स्थानामुळे (location) हा तळ आजही भारतीय नौदल तळ म्हणून वापरला जातो.

भौगोलिक माहिती   

वरसोली हे महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील खडताल नदीच्या मुखाजवळ वसलेले एक किनारपट्टीचे ठिकाण आहे. यात एका बाजूला सह्याद्री पर्वतांवर सुरुची (कासुरीना) आणि नारळाच्या झाडांची हिरवीगार झाडे आणि दुसरीकडे सुंदर निळा अरबी समुद्र आहे. हे मुंबईच्या दक्षिणेस ९६ किमी आणि पुण्याच्या पश्चिमेस १६९ किमी अंतरावर आहे.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

पॅरासेलिंग, बनाना  बोट राईड्स, मोटरबोट राईड्स, जेट-स्कीइंग, सर्फिंग इत्यादी जलक्रीडा उपक्रमांसाठी वरसोली लोकप्रिय होत आहे.

हे ठिकाण कॅम्पिंग तसेच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे.

घोडे, उंट आणि बग्गी देखील समुद्र किनाऱ्यावर जॉयराइडसाठी उपलब्ध आहेत.

जवळची पर्यटनस्थळे        

वरसोलीसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता

  • अलिबाग: वरसोलीच्या आग्नेयेस ३ किमी अंतरावर आहे. जलक्रीडा आणि तिथल्या संस्कृतीशी संबंधित सर्व उपक्रमांमुळे हे 'मिनी गोवा' म्हणून प्रसिद्ध आहे.
  • मुरुड जंजिरा किल्ला: हा किल्ला १७ व्या शतकातील आहे आणि तो मुरुडच्या किनाऱ्यापासून आत समुद्रात आहे. हे ५० किलोमीटर अंतरावर वसलेले स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हा किल्ला अंडाकृती आकाराच्या खडकावर आहे. किल्ल्याला १९ गोल बुरुज आहेत.
  • फणसाड पक्षी अभयारण्य: रेवदंडा-मुरुड रस्त्याने वरसोलीपासून ४४.७ किमी अंतरावर आहे. त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी प्रजाती आहेत. येथे ७०० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या वनस्पती आणि पक्षी, फुलपाखरे, पतंग, साप आणि सस्तन प्राण्यांची अपवादात्मक श्रेणी आहे.
  • रेवदंडा किनारा आणि किल्ला: वरसोलीच्या १.९ किमी दक्षिणेस वसलेले रेवदंडा हे पोर्तुगीज किल्ला आणि समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • कोरलाई किल्ला: वरसोली समुद्रकिनाऱ्यापासून २५.८ किलोमीटर दक्षिणेस आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी हा एक, जिथे सात हजार घोडे सामावू शकतात. कोरलाई किल्ला कोकणातल्या इतर किल्ल्यांप्रमाणेच वास्तुशिल्पचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथले ऐतिहासिक महत्त्व आणि आश्चर्यकारक दृश्यासाठी हा किल्ला बघणे आवश्यक आहे.
  • कोलाबा किल्ला: चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या अरबी समुद्रात वसलेला हा ३०० पेक्षा जास्त वर्ष जुना किल्ला पर्यटकांच्या आकर्षणापैकी एक आहे. कोलाबा किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे बांधकाम होते आणि एप्रिल १६८० मध्ये त्यांच्या मृत्यूच्या पूर्वसंध्येला ते पूर्ण झाले. हा किल्ला मराठा नौदलाचा मुख्य तळ होता नंतर इंग्रजांच्या काळातही याला महत्त्व प्राप्त झाले.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

 • वरसोलीला रस्ते, रेल्वे तसेच जलमार्गाने जाता येते. हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहन, बस आणि कॅब मुंबईहून वरसोलीसाठी उपलब्ध आहेत. गेटवे ऑफ इंडिया पासून मांडवा पर्यंत फेरी देखील उपलब्ध आहे, मांडवा पासून वरसोलीसाठी स्थानिक वाहने उपलब्ध आहेत.
 • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १०९ किमी (३ तास ४ मिनिटे)
 • जवळचे रेल्वे स्टेशन: पेण ३१ किमी (५८ मिनिटे)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्नपदार्थ येथील वैशिष्ट्य आहे. हे सर्वात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

 • वरसोलीमध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
 • सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग मध्ये आहे.
 • अलिबाग मुख्य पोस्ट ऑफिस वरसोलीपासून २ किमी दूर आहे.
 • वरसोलीपासून ३.४ किमी अंतरावर पोलीस स्टेशन आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

एमटीडीसीचे हॉलिडे होम वरसोली येथे आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

 • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
 • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
 • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
 • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू