• A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

WeatherBannerWeb

Banner Heading

Asset Publisher

वेलास समुद्रकिनारा (रत्नागिरी)

महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात वेलास भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे. हे कोकण विभागातील सर्वात सुरक्षित आणि व्यापक किनारपट्टीपैकी एक आहे. वेलास इको-टूरिझमसाठी आणि विशेषतः कासवाच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

जिल्हा/विभाग :

रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास  :

वेलास महाराष्ट्रातील कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. वेलास स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनारे आणि कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. कित्येक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले प्रजीतीची मादी कासवे अंडी घालण्यासाठी या ठिकाणी येतात. दरवर्षी निसर्ग संवर्धन करणारे गट फेब्रुवारी ते मे दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करतात. या नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांची अत्यंत काळजी घेतली जाते आणि नंतर त्यांना अरबी समुद्रात सोडले जाते. 

सह्याद्री निसर्ग मित्र मंडळ संस्थेने या ठिकाणाचे अनोखे निसर्गसौंदर्य ओळखले आणि मग हे ठिकाण प्रकाशझोतात आले. निसर्ग मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी या दरवर्षी जन्मला येणाऱ्या या नव्या कासवांच्या संरक्षणाचे महत्त्व ओळखले आणि ते या कासवांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. गेल्या १५ वर्षात हजारो नव्याने जन्मलेल्या कासवांना त्यांच्या संस्थेने सुरक्षितपणे अरबी समुद्रात सोडले आहे.
 

भूगोल :
वेलास हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील सावित्री नदी आणि भारजा नदी दरम्यानची एक किनारपट्टी आहे. तिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे महाडच्या पश्चिमेस ६७ किमी, रायगडापासून ११८ किमी आणि मुंबईपासून २१५ किमी अंतरावर आहे. 

हवामान :

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते. इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी  :

नारळ आणि सुरू (कॅसुरीना) झाडांनी झाकलेल्या अज्ञात किनाऱ्यांसाठी वेलास प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा खूप लांब, रुंद आणि शांत आहे. पर्यावरणीय महत्त्व असल्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील इतर किनाऱ्यांइतके उपक्रम नाहीत. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संवर्धकांना आकर्षित करते.

जवळची पर्यटनस्थळे  :

वेलाससह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.
बाणकोट किल्ला: वेलास समुद्रकिनाऱ्यापासून ४ किमी अंतरावर किल्ला सावित्री नदीच्या मुखाजवळच्या टेकडीवर आहे.
केळशी समुद्रकिनारा : वेलासपासून ३१ किमी दूर, हे ठिकाण वनस्पती आणि प्राणी आणि समुद्री शिंपल्यासाठी प्रसिद्ध आहे.
आंजर्ले समुद्रकिनारा: वेलास समुद्रकिनाऱ्याच्या दक्षिणेस ४० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांना त्याच्या स्वच्छतेसाठी आकर्षित करते आणि त्यात नारळाच्या झाडांचे हिरवेगार आवरण आहे.
हरिहरेश्वर: वेलास समुद्रकिनाऱ्याच्या १३.५ किमी उत्तरेस असलेले, हे ठिकाण प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी ओळखले जाते. हे खडकाळ समुद्रकिनारा आणि किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
सुवर्णदुर्ग किल्ला: हा गौरवशाली किल्ला हरनई किनाऱ्यापासून ०.२५ किमी अंतरावर ८ एकर क्षेत्रात बांधला गेला. हा किल्ला वेलासच्या दक्षिणेस ४३ किमी अंतरावर आहे.
 

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे :

वेलासला रस्ते आणि रेल्वेने जाता येते. हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन बसेस मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथून मंडणगड आणि दापोलीसाठी उपलब्ध आहेत, तेथून स्थानिक वाहतुकीने वेलास गाठता येते.
जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई २२४ किमी (६ तास ४ मिनिटे)
जवळचे रेल्वे स्टेशन: खेड ७८.२ किमी (२ तास १३ मिनिटे)

 

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स  :

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने सी-फुड हे येथील वैशिष्ट्य आहे.

 

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन  :

वेलास मध्ये होमस्टेच्या उपलब्ध आहेत.
जवळची रुग्णालये श्रीवर्धन येथे आहेत.
जवळचे पोस्ट ऑफिस वेलास पासून २.८ किमी अंतरावर आहे.
सर्वात जवळचे पोलीस स्टेशन ३ किमी अंतरावर आहे.
 

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट :

नजीकचे एमटीडीसी रिसॉर्ट हरिहरेश्वर येथे आहे जे वेलास समुद्रकिनाऱ्यापासून १३.५ किलोमीटर अंतरावर आहे.

 

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ  :

हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे. 
जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.
 

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी

 


Tour Package

Hotel Image
Blue Diamond Short Break Bustling Metropolis

2N 1Day

Book by:

MTDC Blue Diamond

Where to Stay

Responsive Image
एमटीडीसी वेलनेश्‍वर रिसॉर्ट

हे रिसॉर्ट एका टेकडीवर आहे ज्याच्या दोन्ही बाजूला समुद्र आहे. कोकणी हाऊस नॉन-एसी आणि एसी अशा दोन प्रकारच्या खोल्या आहेत. हे मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे आणि बागांची देखभाल चांगली आहे. रेस्टॉरंटमध्ये परवडणाऱ्या किमतीत चांगल्या दर्जाचे जेवण मिळते. शांत, नारळाच्या झालर असलेला समुद्रकिनारा अभ्यागतांना पोहण्याची किंवा आराम करण्याची एक आदर्श संधी देतो. परिसरात एक जुने शिवमंदिर आहे ज्यात यात्रेकरू येत असतात.

Visit Us

Tourist Guides

Responsive Image
पाटकर निशिगंध अरविंद

ID : 200029

Mobile No. 9867419194

Pin - 440009

Responsive Image
भगवान सचिन

ID : 200029

Mobile No. 9892528975

Pin - 440009

Responsive Image
तलसानिया हेमाली निमिष

ID : 200029

Mobile No. 9819546365

Pin - 440009

Responsive Image
पाटील दैवत विष्णू

ID : 200029

Mobile No. 9757253383

Pin - 440009