वेंगुर्ला - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
वेंगुर्ला
वेंगुर्ला हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. हे ठिकाण नितळ-पाणी आणि नारळ, काजू आणि आंब्याच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याच्या अगदी उत्तरेला असलेले हे ठिकाण ऐतिहासिक काळापासून नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते.
जिल्हा/विभाग
सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
ऐतिहासिक माहिती
वेंगुर्ला हा महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक तालुका आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय किनारे आणि डोंगराळ परिसरासाठी ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे सर्वात व्यस्त बंदर आणि व्यापार केंद्र होते.
भौगोलिक माहिती
वेंगुर्ला हे दक्षिण कोकणातील दाभोळ आणि मोचेमाडच्या डोंगरांच्या मध्ये स्थित एक किनारपट्टी आहे. त्याच्या एका बाजूला हिरव्यागार सह्याद्री पर्वत रांगा आणि दुसऱ्या बाजूला निळा अरबी समुद्र आहे. हे सिंधुदुर्ग शहराच्या नैऋत्येस ३८ किमी, कोल्हापूरपासून १७० किमी आणि मुंबईपासून ४७७ किमी दूर आहे.
हवामान
या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.
करण्यासारख्या गोष्टी
वेंगुर्ला त्याच्या आसपासच्या परिसरातील मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध आहे. सायकलिंग, कायकिंग, फिशिंग, पोहणे आणि बीच कॅम्पिंग सारखे जलक्रीडा उपक्रम इथे उपलब्ध आहेत.
जवळची पर्यटनस्थळे
वेंगुर्लासह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.
-
- वायंगणी समुद्रकिनारा: अत्यंत सुंदर तरीही अज्ञात समुद्रकिनारा वेंगुर्लाच्या वायव्येस ७ किमी अंतरावर आहे.
- कोंडुरा समुद्रकिनारा: वेंगुर्लापासून १० किमी अंतरावर नयनरम्य समुद्रकिनारा. आश्चर्यकारक सौंदर्य आणि समुद्राच्या गुहेसाठी लोकप्रिय.
- खजानादेवी मंदिर: सुमारे ३०० वर्ष जुने, कोंकणी शैलीत बांधलेले सुंदर मंदिर. हे वेंगुर्ला किनाऱ्यापासून ७.४ किमी अंतरावर आहे.
- शिरोडा समुद्रकिनारा: त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि मिश्र महाराष्ट्रीय-गोवा संस्कृतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे वेंगुर्लाच्या दक्षिणेस २०.४ किमी अंतरावर आहे.
- निवती समुद्रकिनारा: वेंगुर्लाच्या वायव्येस ३७ किमी अंतरावर असलेला हा सुंदर निर्जन किनारा.
रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे
- वेंगुर्ला रस्त्याने गाठता येते. हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66) मुंबई-गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहन, खाजगी आणि लक्झरी बस सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा या शहरांमधून उपलब्ध आहेत.
- जवळचे विमानतळ: चिपी विमानतळ सिंधुदुर्ग ३५.३ किमी (५६ मिनिटे), दाबोलिम विमानतळ गोवा ८९ किमी (२ तास १८ मिनिटे)
- जवळचे रेल्वे स्टेशन: सावंतवाडी २० किमी (४० मिनिटे), कुडाळ २५.१ किमी (४७ मिनिटे)
खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने सी-फुड येथील वैशिष्ट्य आहे. हे सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबई आणि गोव्याशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात. मालवणी जेवण इथली खासियत आहे.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
- वेंगुर्ला हे एक छोटे शहर असल्यामुळे राहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध नाहीत. तंबू रिसॉर्ट, लॉज आणि घरगुती निवास सुविधा उपलब्ध आहेत. बहुतेक ठिकाणी क्रेडिट कार्ड स्वीकारले जात नाहीत.
- समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात रुग्णालये उपलब्ध आहेत.
- पोस्ट ऑफिस वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेस आहे.
- पोलीस स्टेशन समुद्रकिनाऱ्यापासून ५.३ किमी दूर आहे.
जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट
वेंगुर्लापासून ५१.२ किलोमीटर अंतरावर एमटीडीसी रिसॉर्ट तारकर्ली येथे आहे. वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेस १२.५ किलोमीटर अंतरावर कोंडुरवाडी येथे एमटीडीसीशी सलग्न होम-स्टे उपलब्ध आहेत.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ
- हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
- जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
- पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
- पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.
या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी, मालवणी
Gallery
How to get there

By Road
मुंबईहून कुडाळ पर्यंत NH-17 घ्या. तिथून, वळण घ्या. पुण्याहून नयनरम्य गगनबावडा (करुळ घाट), तळेरे येथून कुडाळ पर्यंत जा. पुणे-कोल्हापूर-आंबोली-सावंतवाडी-वेंगुर्ला मार्गेही वाहन चालवता येते. राज्य परिवहन बसेस मुंबई, पुणे, कुडाळ आणि सावंतवाडी येथून धावतात.

By Rail
जवळचे रेल्वेहेड कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे आहेत जे सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहेत.

By Air
सर्वात जवळचे विमानतळ दाभोलीम, गोवा येथे आहे.
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
MTDC Resort Kondurawadi
The nearest MTDC resort is at Tarkarli, 51.2 KM from Vengurla. MTDC associated home stay is available at Kondurawadi 12.5 KM to the north of Vengurla beach.
Visit UsTour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
जॉयल निखिल पांडुरंग
ID : 200029
Mobile No. 7738769422
Pin - 440009
जॉयल निखिल पांडुरंग
ID : 200029
Mobile No. 9004771928
Pin - 440009
गोवल इरफान हनीफ
ID : 200029
Mobile No. 9029706383
Pin - 440009
गावडे त्र्यंबक कृष्णकांत
ID : 200029
Mobile No. 9619531353
Pin - 440009
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS