• Screen Reader Access
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

विघ्नहर ओझर मंदिर (अष्टविनायक)

श्री विघ्नहर ओझर मंदिर हे महाराष्ट्रातील आठ अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे.
जिल्हा/विभाग

पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती     
ओझर हे कुकडी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. येडगाव धरणाचे बॅक-वॉटर श्री विघ्नहर गणपती (विनायक) मंदिराच्या अगदी मागे आहे, जिथे अलिकडच्या वर्षांत सुंदर ‘घाट’ बांधण्यात आला आहे. येथे काही वॉटर स्पोर्ट्स देखील उपलब्ध आहेत.
येथे विनायक (गणपती/ गणपतीचे एक रूप) मंदिर आहे. सध्याचे मंदिर १९६७ मध्ये 'श्री अप्पाशास्त्री जोशी' यांनी जीर्णोद्धार केलेले होते जे गणेशाचे भक्त होते. जरी हे इतके ऐतिहासिक असले तरी, आपल्याला माहित आहे की हे मंदिर पुर्वी पोर्तुगीजांच्या विरोधात वसई किल्ल्यावरील लढाईचा विजय साजरा करण्यासाठी चिमाजी आप्पांनी पेशव्यांच्या काळात १७८५ साली मंदिराची पुनर्बांधणी केली होती.
मंदिराच्या पूर्ण तटबंदी असलेल्या दगडी भिंती या ठिकाणाचा अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली इतिहास दर्शवतात. मंदिराची सुवर्ण अधिरचना तसेच दीपमाला (दगडी खांब) सुप्रसिद्ध आहे. ओझर गणपती मंदिराचे महत्त्व म्हणजे हे सर्वात प्रसिद्ध विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिर आहे. गणपतीची पूर्वाभिमुख मूर्ती सिद्धी आणि रिद्धी यांच्यासह, प्रवेशद्वारात शास्त्रीय आणि भित्तीकामासह दिसते.
या मूर्तीलाबद्दलची आख्यायिका सांगते की, देवांचा राजा इंद्र यांनी राजा अभिनंदन याने आयोजित केलेल्या प्रार्थनेचा नाश करण्यासाठी विघ्नसूर या राक्षसास निर्माण केले. तथापि, राक्षसाने एक पाऊल पुढे जाऊन सर्व वैदिक, धार्मिक गोष्टी नष्ट केल्या आणि संरक्षणासाठी लोकांनी दिलेली हाक ऐकून गणेशाने त्याचा पराभव केला. पुढे असे म्हटले आहे की, हरल्यावर राक्षसाने दयेची याचना केली. गणेशाने त्यास माफ केले, परंतु ज्या ठिकाणी गणेश पूजन चालू आहे तिथे राक्षसाने जाऊ नये या अटीवर! त्या बदल्यात राक्षसाने विनंती केली की गणेशाचे नाव घेण्यापूर्वी त्याचे नाव घेतले जावे, अशा प्रकारे गणेशाचे नाव विघ्नहर किंवा विघ्नेश्वर झाले. अशा प्रकारे येथील गणेशाला श्री विघ्नेश्वर विनायक म्हटले जाते.

भौगोलिक माहिती    
कुकडी नदीच्या काठावर हे मंदिर आहे जिथे येडगाव धरण बांधलेले आहे.

हवामान     
•    या भागात वर्षभर उष्ण आणि काही अंशी शुष्क (कोरडे) हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
•    एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
•    हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
•    या भागात सरासरी वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी इतका असतो.

करण्यासारख्या गोष्टी      
•    आध्यात्मिक भावनांसह शांत वातावरण मंदिराच्या पवित्र वातावरणात भर घालते. 
•    दुपारची महापूजा आणि संध्याकाळची महाआरती ही मंदिराच्या महत्त्वाच्या विधींपैकी एक आहे.
•    मंदिराभोवती आणि तलावाजवळ बरीच दुकाने आहेत. तलावत बोटींगची सोय आहे.

जवळची पर्यटनस्थळे     
•    चौपाटी पॉइंट येडगाव धरण (४.३ किमी)
•    हबशी महाल (९.३ किमी)
•    भीमाशंकर बौद्ध लेणी (११.३ किमी)
•    जुन्नर किल्ला (११.५ किमी)
•    लेन्याद्री गणपती (१४.५ किमी)
•    लेन्याद्री बौद्ध लेणी (१४.५ किमी)

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे     
•    हवाई मार्गाने:- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (८१.९ किमी)
•    रेल्वेने:- पुणे रेल्वे स्टेशन (८७.६ किमी)
•    रस्त्याने:- जुन्नर, ओझर पासून ८ किमी अंतरावर आहे जिथे बस स्थानक आहे आणि कॅब किंवा खाजगी कारने पोहोचता येते.
•    शिवाजीनगर बस स्थानकातही नियमित MSRTC बस आणि यात्रेकरूंच्या गरजेनुसार लक्झरी बस सेवा आहे.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स    
महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण जवळपासच्या रेस्टॉरंट्समध्ये मिळते.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन    
•    मंदिराजवळ अनेक निवासस्थाने आहेत.
•    जवळचे पोलीस स्टेशन:- जुन्नर पोलीस स्टेशन (११.३ किमी) अंतरावर आहे.
•    श्री विघ्नहर हॉस्पिटल (०.४ किमी) अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    
MTDC रिसॉर्ट माळशेज घाट (३५.८ किमी) अंतरावर आहे.

पर्यटन मार्गदर्शक (माहिती)    
संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटन मार्गदर्शक अष्टविनायक मंदिरांच्या दर्शनासाठी टूर आयोजित करतात.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ      
•    मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ ऑगस्ट ते फेब्रुवारी आहे कारण या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात.
•    मंदिराची वेळ:- सकाळी ५.०० ते रात्री १०.३० सर्व दिवस.
•    ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात फोटोग्राफीला परवानगी नाही.
•    मंदिराजवळ मोफत वाहन पार्किंग उपलब्ध आहे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा     
इंग्रजी, हिंदी, मराठी.