• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती

’अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व महाराष्ट्रीय अगदी मनापासून पाळतात. महाराष्ट्रात पक्वान्नांचे स्वाद-सुगंध, स्वरुप- शैली इतक्या विविध आहेत, की ही मेजवानी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच असते. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती मध्ये प्रामुख्याने कोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खानदेशी व-हाडी असे पाच मुख्य प्रकार आहेत. कोकणी पध्दतीत खोबरे विशेषत्वाने वापरतात, तर वऱ्हाडी पध्दतीत तेल विशेष वापरतात. खोवलेले (किसलेले) खोबरे बर्या्च पाककृतींच्या मसाल्यात वापरतात, पण तरीही खोबरेल तेल मात्र तितकंसं वापरलं जात नाही. भाज्यांमध्ये शेंगदाणे, काजू वापरले जातात, पण तरीही शेंगदाण्याचं तेल मुख्य स्वयंपाकासाठी वापरतात. दुसरा महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे कोकम पेय (कोकमापासून बनविलेल व सोलकढी) जेवणानंतर पाचक पेय म्हणून कोकणात दिली जाते.

महाराष्ट्रात प्रत्येक ऋतूनुसार सुद्धा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये थंडगार आमरस, पावसाळ्यात गरमागरम भजी, सांडगे तर थंडीच्या दिवसात तिळगुळ असे पदार्थ राज्यात सर्वत्र आवर्जून खाल्ले जातात. महाराष्ट्रात शहरी भागात फास्टफूडलाही मराठमोळा टच देऊन अनेक पदार्थ हिट झाले आहेत, वडापाव, भेळपुरी, मसाला सॅन्डविच इत्यादी हे त्याचेच प्रकार! 

खाद्यभ्रमंतीसाठी महाराष्ट्राचा कानाकोपरा प्रसिद्ध आहे, प्रत्येक मैलानंतर बदलणारी चव चाखण्यासाठी एकदा महाराष्ट्र सफर नक्की करावीच! 


महाराष्ट्रीयन आनंद

Asset Publisher

प्रतिमा गॅलरी पाककृती