• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

महाराष्ट्रातील परंपरा

महाराष्ट्राच्या परंपरेचे वर्णन

महाराष्ट्र हे भारतातील तिसरे मोठे राज्य आहे. त्यात ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या वारकरी धार्मिक चळवळीतील मराठी संतांचा मोठा इतिहास आहे, जो महाराष्ट्राच्या तसेच मराठी संस्कृतीचा पाया आहे. 
१७ व्या शतकातील मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा महाराष्ट्र तसेच भारतावर मोठा प्रभाव होता आणि त्यांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना मानवी जीवनाचे व स्वतंत्रतेचे मूल्य अधोरेखित करते.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संस्कृतींचा समावेश आहे ज्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन इत्यादींशी संबंधित संस्कृतींचा सहभाग आहे. 
भगवान गणेश, मारुती, शिवलिंगाचे रूप असलेले महादेव, खंडोबा, काळूबाई देवी आणि भगवान विठ्ठल या महाराष्ट्रातील हिंदू धर्मियांद्वारे पूजा केल्या जाणाऱ्या काही प्रमुख देवता आहेत. 
महाराष्ट्र हे मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि कोकण अशा विविध प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे. 
मराठी भाषेसोबतच इतर वेगवेगळ्या बोलीभाषा, लोकगीते, खाद्यपदार्थ आणि भिन्न जातींच्या रूपात प्रत्येकाची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे.


परंपरांची यादी

Asset Publisher