Kajwa Festival 2017

काजवा महोत्सव २०१७ : वर्ष्यातून एकदाच निघणारे काजवे बघण्यासाठी लोक मे महिना संपायची वाट पाहतात. पहिला वळवाचा बारीक पाऊस झाल्यावर काजवे हळूहळू बाहेर येऊ लागतात. हे काजवे सध्या कितीतरी गरजू आदीवासी कुटुंबाना पुढील कितीतरी महिना पुरेल असा आर्थिक फायदा करून देत आहेत. मुळातच जिथे काजवे निघतात तो भाग सादडा, बेहडा अश्या कमी होत असल्येल्या झाडांचा व दुर्गम आहे. जिथे अजूनही १ रुपया हि मोठी किंमत ठेवतो. गाईड, जेवण बनवणे, टेन्ट भाडयाने देणे हे स्थानिक लोकांचे नवीन उपजीविकेचे साधन आहेत. व त्यामूळे त्यांच्या जीवनमानात बराच चांगला फरक झाला आहे. मागील काही वर्ष्यांचा अनुभव लक्ष्यात घेता चालू वर्षी वन विभाग, पोलीस , पर्यटन आणि स्थानिक प्रशासन हयांनी बरेच नवीन निर्बंध पर्यटकांवर घातले आहेत, जे स्तुत्य आहेत व काजवे व इतर प्राणी सुरक्षित राहतील ह्याची काळजी घेणारे आहेत ज्यामध्ये मद्यपान , धूम्रपान, आरडाओरडा करणे, जोरात संगीत वाजवणे, प्लास्टिक बाटल्या व थाळ्या सोबत ठेवणे ह्यांना पूर्ण बंदी आहे. काजवे बघायला जाणार असाल तर दारू, सिगारेट, प्लास्टिक,थर्माकोल प्लेट्स विसरून जा. कचरा करणाऱ्याला जबरी दंड बसणार तसेच दारूसोबत बाळगणे हा गुन्हा ठरणार आहे. आग लावणे , काजवे पकडणे, झाडांवर माती फेकणे हे पूर्णतः बंद केले आहे, त्याचप्रकारे प्रत्येक वाहनात स्थानिक गाईड असणार आहे त्यामुळे पर्यटकांवर लक्ष्य ठेवणे सोपे होणार आहे. एकंदरीतच हा महोत्सव शिस्तीत व पर्यावरणाची काळजी घेणारा ठरणार आहे हे नक्की. ह्या मूळे पुढील कितीतरी वर्ष आपल्या मुलांना काजवे पाह्यला मिळणार हेहि निश्चित. आणी हो , जाताना आंबा, जांभळं व इतर फळ्यांच्या बिया न्यायला विसरू नका, पाऊस सुरु होणार आहे, पर्यावरण जपण्यात तेव्हडाच आपला खारीचा वाटा.READ MORE HIDE